sports news-test matchsports news- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियात ( IND vs AUS) यांच्यातील टी 20 मालिका संपली असून सर्वांना आता कसोटी मालिकेचे (test match) वेध लागले आहेत. दोन्ही देशांमधील प्रतिष्ठेच्या कसोटी मालिकेला 17 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये (Adelaide) सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला एक मोठा धक्का बसला आहे.

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) पहिला कसोटी सामना खेळणार नाही, हे आता अधिकृतरित्या स्पष्ट झाले आहे. सिडनीमध्ये झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये वॉर्नरची कंबर दुखावली होती. वॉर्नरने कंबर दुखीमुळे तातडीने मैदान सोडलं होतं. त्यानंतर झालेली तिसरी वन-डे आणि टी 20 मालिका वॉर्नर या दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. त्यापाठोपाठ आता पहिल्या टेस्टमधून देखील वॉर्नर आऊट झाला आहे.

------------------------------------------------------------------

Must Read

1) 'या' जिल्ह्यातील पर्यटनस्थळे उद्यापासून खुली करणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

2) मराठा आरक्षणासाठी आजचा दिवस महत्वाचा, घटनापीठसमोर सुनावणी

3) शिक्षण सेवकांची थांबवलेली भरती पुन्हा सुरू होणार !

4) लालबाग सिलिंडर स्फोटप्रकरणी पिता-पुत्रावर मनुष्यवधाचा गुन्हा

5) चार कॅमेऱ्यांचा Vivo Y51 भारतात लॉन्च; अद्ययावत फिचर्ससह बजेट स्मार्टफोन

-------------------------------------------------------------------

मागील दौऱ्यात वॉर्नरवर होती बंदी

भारतीय टीम यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आली होती तेंव्हा त्या टीममध्ये देखील वॉर्नर नव्हता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत बॉलची छेडछाड केल्याप्रकरणी वॉर्नरवर एक वर्षांची बंदी घालण्यात आली होती. 'वॉर्नर हा महत्वाचा खेळाडू असून त्याची कमतरता टीमला जाणवेल', असं मत ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमचे कोच जस्टीन लँगर यांनी व्यक्त केलं आहे. (sports news)

पुकोवस्की खेळण्याची शक्यता कमी

डेव्हिड वॉर्नरचा सलामीचा सहकारी पुकोवस्की देखील भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी (test match) सामन्यामध्येही शक्यता कमी आहे. भारत 'अ' विरुद्ध झालेल्या सराव सामन्यात फास्ट बॉलर कार्तिक त्यागीने टाकलेला बाऊन्सर पुकोवस्कीच्या हेल्मेटला लागला. त्यानंतर त्याने मैदान सोडले. पुकोवस्की ऑस्ट्रेलियाच्या टीमसोबत राहिल. पण दुसरा सराव सामना खेळणार नाही.' भारत 'अ' आणि ऑस्ट्रेलिया 'अ' यांच्यातील दुसरा सराव सामना शुक्रवारपासून सुरू होणार आहे.

पुकोवस्की देखील खेळण्याची शक्यता कमी असल्याने ऑस्ट्रेलियन टीममध्ये मार्कस हॉरीसचा समावेश होण्याची शक्यता असून हॉरीस आणि जो बर्न्स या सलामी जोडीसह ऑस्ट्रेलियन टीम पहिल्या टेस्टमध्ये उतरण्याची शक्यता आहे.