smartphone  infinix


Infinix कंपनीने काही दिवसांपूर्वीच भारतातील आपला सर्वात स्वस्त स्मार्टफोन Smart HD लाँच केला होता. हा स्मार्टफोन आझ पहिल्यांदाच विक्रसाठी उपलब्ध झाला आहे. Infinix Smart HD मध्ये 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरी आणि शानदार डिस्प्ले (smartphone features)आहे.

Infinix Smart HD किंमत : 

कंपनीने Infinix Smart HD या स्मार्टफोनची किंमत 5,999 रुपये ठेवली असून ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर दुपारी १२ वाजेपासून या फोनसाठी सेलला सुरूवात झाली आहे. या फोनसाठी टोपाज ब्लू, क्वार्ट्ज ग्रीन आणि ऑब्सिडियन ब्लॅक अशा तीन कलरचे पर्याय आहेत.

----------------------------------------------------

Must Read

1) मोठी बातमी : एल्गार परिषदेला पोलिसांनी परवानगी नाकारली

2) मराठा समाजाला राज्य सरकारचा दिलासा

3) SC, ST विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज!

4) हेअरकटनंतर व्हायरल झाला फोटो, तब्बल 10 वर्षांनंतर झाली कुटुंबीयांची भेट

5) सुरेश रैनाने मागितली माफी, 'त्या' रात्रीची पूर्ण कहाणी समोर

6) मलम लावण्याच्या बहाण्याने तरुणीच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श

--------------------------------------------------------

Infinix Smart HD स्पेसिफिकेशन्स :

या बजेट स्मार्टफोनमध्ये कंपनीने दमदार स्पेसिफिकेशन्स (smartphone features) दिलेत. फोनमध्ये 6.1 इंच एचडी+ ड्रॉप नॉच डिस्प्ले असून 12nm हीलियो ए20 क्वॉडकोर प्रोसेसर आहे. 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज यामध्ये मिळेल. एंट्री लेवल स्मार्टफोनसाठी कस्टमाइज केलेल्या अँड्रॉइड 10 (Go Edition) चा सपोर्ट या डिव्हाइसला आहे.

Infinix Smart HD कॅमेरा :

फोनमध्ये ड्युअल-एलईडी फ्लॅशसोबत 8 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय सेल्फीसाठी 5 मेगापिक्सेलचा कॅमेराही आहे. 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरी असलेल्या या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ, जीपीएस, वाय-फाय यांसारखे फिचर्स आहेत.