today politics news on bacchu kadutoday politics news- केंद्र सरकारच्या कृषी कायद्यावरून (agriculture farmer) शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखवणाऱ्या आणि दुचाकीवरून दिल्लीला जाण्याची नौटंकी करणाऱ्या बच्चू कडू यांनी पहिले स्वतःच्या घरातील अंधार दूर करावा आणि स्वतःला सिद्ध केल्यानंतर मग इतरत्र उजेड पाडण्याची भाषा वापरावी, अशी टीका भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे. 

तसेच मिळालेल्या मंत्रीपदाचा तुकडा जपण्यासाठी त्यांनी लाचारी पत्कारली आहे. हिंमत असेल तर राष्ट्रवादीच्या नेत्यांशी दोन हात करून ते पळवून नेत असलेला विदर्भाचा निधी थांबवून दाखवावा, असेही कुळकर्णी यांनी म्हटले आहे.

----------------------------------------------------

Must Read 
सध्या दिल्लीत शेतकरी आंदोलनाचा (agriculture farmer) विषय पेटला आहे. विरोधी पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी शेतकऱ्यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे. या प्रकरणी विरोधी पक्षाचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींचीही भेट घेणार असल्याची चर्चा आहे. या साऱ्या मुद्द्यावर भाजपाकडून कडाडून टीका केली जात आहे.(today politics news)

बच्चू कडू ज्या खात्याचे मंत्री आहेत, त्या खात्याची एकही बैठक नाही. पश्चिम विदर्भ पुन्हा एकदा सिंचन अनुशेषग्रस्त झाला आहे. सिंचनाचा अनुशेष दूर करण्याच्या लढ्याला बच्चू कडू यांनी मूठमाती दिली आहे. त्यांच्या स्वतःच्या अचलपूर मतदारसंघातील सर्व सिंचन प्रकल्प ठप्प पडले आहेत. 

यावर चकार शब्द न काढणारे आणि राज्यात मंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी ठरलेले बच्चू कडू प्रसिद्धीच्या हव्यासापोटी दुचाकीवरून दिल्लीला जाण्याची नौटंकी करीत आहेत. शेतकऱ्यांची दुरवस्था रोखण्यासाठी बच्चू कडू यांनी पश्चिम विदर्भातील ठप्प असलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करावे, असेही कुळकर्णी यांनी म्हटले आहे.