singer-sofia-ellar-accidentally-set-hair-on-fire

(Songs) 2020 वर्ष कधी एकदाचं संपतं असंच सर्वांना झालं आहे. 2021 या नव्या वर्षाची प्रतीक्षा सर्वांना आहे. 2020 साल तसं कधीच विसरता येणार नाही पण ते कोरोनासारख्या कटु आठवणींमुळे. त्यामुळे किमान ख्रिसमस सेलिब्रेशन आणि नवीन वर्षांचं आगमन उत्साहात करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. 2020 मधील काही आनंदाचे क्षण राखून ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत. असाच प्रयत्न सिंगर सोफिया एलारनंही (singer sofia ellar) केला. पण या सेलिब्रेशननंही तिला एक धक्कादायक अशीच आठवण दिली. ज्याचा व्हिडीओ (video) सोशल मीडियावर व्हायरल (social media viral) होतो आहे.

नुकतंच ख्रिसमस (Christmas) सेलिब्रेशन झालं. गायिका सोफियाही आपल्या बॉयफ्रेडसह ख्रिसमस एन्जॉय करत होती.  दोघंही एकत्र ख्रिसमस कॅरोल (Christmas Carol) गात होते. तेव्हा अचानक सोफियाच्या केसांना आग (Hair On Fire)  लागते. सोफियान आपल्या इन्स्टाग्रामवर (Instagram) हा व्हिडीओ शेअर केला आहे.


व्हिडीओत पाहू शकता,  27 वर्षांची सोफिया बॉयफ्रेंड अल्वारो सोलरच्या समोर बसली आहे. त्यांनी ख्रिसमसची सजावट केलेली आहे. ख्रिसमस ट्री सजावा आहे. काही कँडल्सही लावले आहेत.(Songs) अल्वारो ख्रिसमस कॅरोल गायला सुरुवात करतो आणि सोफिया त्याला साथ देते. गाणं गाता गाता ती पुढे मागे होते. तिच्या पाठीमागे टेबलवर मेणबत्त्या पेटत असतात. सोफियानं केस सोडलेले आहेत. जेव्हा ती मागे होते तेव्हा तिचे केस पेटत्या मेणबत्तीला लागतात आणि त्यांना आग लागते.

सुरुवातीचे काही क्षण सोफियालाही समजत नाही की तिच्या केसांना आग लागली आहे. जेव्हा ती पुन्हा थोडी मागे होते आणि तिचे केस तिच्या पाठीला लागतात तेव्हा तिला गरम काहीतरी लागतं. मागे वळून पाहते तर तिच्या केसांना पेट घेतलेला असतो. सोफिया आणि अल्वारो दोघंही घाबरतात. सोफिया ओरडतच उठते. अल्वारोही लगेच उठतो आणि सोफिया केसांवरील आग हातानंच विझवण्याचा प्रयत्न करतो.

सुदैवानं आग विझते आणि सोफिया तिथून पळतच सुटते. त्याचवेळी शॅम्पिअनचा ग्लासही पडतो. सोफिया आणि अल्वारोचं वेळीच लक्ष गेल्यानं त्यांच्या जीवाला मोठी हानी पोहोचली नाही. व्हिडीओ पोस्ट करताना सोफियानं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे, "2019 आम्ही चांगले होतो. 2020 मध्ये आम्ही आग लावली आणि ग्लास तोडले. हेलो 2021". यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत.