health tips- बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या प्रसिद्ध मधाच्या (Honey) ब्रँडमध्ये भेसळ होत असल्याची बातमी काही दिवसांपूर्वीच उघड झाली आहे. आपल्या देशात मधाला अमृतासमान मानले जाते. त्याचा औषध म्हणूनही वापर होतो. याच मधामधील भेसळ उघड झाल्यानं सर्वांना मोठा धक्का बसला. फक्त मधच नाही तर तुमच्या स्वयंपाक घरातील अनेक जीवनावश्यक खाद्यपदार्थामध्ये भेसळ असू शकते. हे भेसळयुक्त खाद्यपदार्थ (Adulterated Food) कसे ओळखायचे याच्या काही सोप्या पद्धती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

----------------------------------------------------------

Must Read

1) कोल्हापूर : पंचगंगा नदीत अज्ञाताचा मृतदेह; खून की आत्महत्या तपास सुरू

2) `पवारसाहेब, तुम्ही या कामासाठी मला फोन करत जाऊ नका....`

3) TMC मध्ये बंड; ‘या’ आमदाराचा राजीनामा

4) ऊर्मिला मातोंडकर यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक

-------------------------------------------------------

दूध (Milk ) : भारत हा जगातील सर्वात जास्त दूग्ध उत्पादन करणारा देश आहे. त्याचबरोबर भारतामध्ये दुधामध्ये सर्वात जास्त भेसळ केली जाते. पाणी, युरीया आणि कॉस्टीक सोडा यांची दुधात सर्रास भेसळ केली जाते. दुधामधील ही भेसळ ओळखण्याची एक सोपी पद्धत आहे. दूधाचा एक ड्रॉप एखाद्या सपाट पृष्भागावर ओता. शुद्ध दूध असेल तर ते संथ गतीनं खाली घरंघळतं आणि त्या पृष्ठभागावर पांढरा डाग उमटतो. भेसळयुक्त दूध लगेच खाली येतं आणि त्याचा कोणताही डाग पृष्ठभागावर दिसत (health tips) नाही.

चहापत्ती (Tea Leaves) :  सकाळी उठल्यावर, रात्री कामासाठी जागताना, घरात पाहुणा आला म्हणून, कोणतेही निमित्त असताना किंवा काहीही कारण नसताना देखील गरम-गरम चहा प्यायला अनेकांना आवडतो. या चहाची पत्ती देखील रंगीत असू शकते. त्यामुळे बाजारातून चहा पत्ती आणल्यानंतर सर्व प्रथम एक चमचा चहापत्ती  टिश्यू पेपरमध्ये टाका. त्या टिश्यू पेपरमध्ये चमच्यानं  चहापत्ती नीट पसरवा. जर टिश्यू पेपरला कलर लागला असेल तर ती चहापत्ती बनावट (Adulterated Food) आहे.

मध (Honey) : मधामधील भेसळ सध्या सर्वांच्या चर्चेचा आणि काळीचा विषय आहे. ही भेसळ ओळखण्याच्या दोन सोप्या पद्धती आहेत. मध शुद्ध आहे कि भेसळयुक्त हे तपासण्यासाठी तुम्हाला पाण्यामध्ये मधाचे काही थेंब टाकावे लागतील. मध खाली पाण्याच्या तळाशी  बसले तर ते शुद्ध आहे हे सिद्ध होते. पण जर मध पाण्यात मिसळले गेले तर ते भेसळयुक्त होते हे सिद्ध होते. अगदी सहजपणे तुम्ही शुदध मध कोणते आहे ? हे या पद्धतीनं ओळखू शकता.

मधाची शुद्धता तपासण्याची आणखी एक पद्धत आहे. कापसाची काडी मधामध्ये बुडवून ती काडी मेणबत्तीवर धरा. शुद्ध मध असेल तर ती काडी लगेच जळेल. अशुद्ध मधाची काडी जळणार नाही किंवा ती जळताना त्याचा आवाज येईल.

मिरची पावडर (Chili Powder) : वेगवेगळ्या खाद्यपदार्थात लागणारा हमखास पदार्थ. मिरची पावडरमध्ये देखील रंगाची भेसळ असू शकते. ती भेसळ ओळखण्यासाठी एक चमचा मिरची पावडर पाण्यानं भरलेल्या ग्लासममध्ये टाका. शुद्ध मिरची पावडर असेल तर त्या पावडरचा रंग बदलणार नाही. पावडरचा रंग पाण्यात बदलला तर ती पावडर अशुद्ध आहे.

मीठ (Salt) : रोजच्या खाण्यात लागणारे मीठ देखील भेसळयुक्त असू शकते. भेसळयुक्त मीठ ओळखण्यासाठी एक चमचा मीठ पाण्यात टाका जर ते मीठ सहज विरघळले तर ते शुद्ध आहे. जर मीठ टाकलेले पाणी हे पांढऱ्या रंगाचे झाले तर ते अशुद्ध आहे.