aishwarya raientertainmentबॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने (aishwarya rai) अनेक वर्षं बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले आहे. तिने हम दिल दे चुके सनम, ताल, देवदास यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. ऐश्वर्या ही मिस वर्ल्ड असून तिच्या सौंदर्यावर अनेकजण फिदा आहेत. ऐश्वर्या आजही तितकीच सुंदर दिसते. ऐश्वर्याने अभिषेक बच्चनसोबत लग्न केल्यानंतर तिने तिच्या कामापेक्षा कुटुंबाला अधिक महत्त्व दिले.

ऐश्वर्याचे बच्चन कुटुंबियांतील सगळ्यांसोबत अतिशय चांगले नाते आहे. अभिषेकची बहीण श्वेता आणि ऐश्वर्या यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. पण ऐश्वर्याची एक गोष्ट श्वेताला अजिबातच आवडत नाही. तिच्या या गोष्टीमुळे तिचा अनेकवेळा रागदेखील येतो अशी कबुली श्वेताने कॉफी विथ करण या कार्यक्रमात दिली होती. कॉफी विथ करण या कार्यक्रमात श्वेता आणि अभिषेकने काही वर्षांपूर्वी हजेरी लावली होती. 

------------------------------------------------

Must Read

1) ग्रामपंचायत बिनविरोध करा अन् पंचवीस लाख रूपये मिळवा! आमदारांची ऑफर

2) मोठी घडामोड, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट पत्र

3) रस्त्यात गाडी थांबवून शरद पवारांनी दिले आशीर्वाद

4) ब्लॅकमेल करत तब्बल 21 वर्षे केलं लैंगिक शोषण आणि त्यानंतर...

5) MIM च्या नेत्याने तिघांना घातल्या गोळ्या VIDEO


--------------------------------------------------------

त्यावेळी त्या दोघांनी अतिशय मनमोकळेपणाने या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक करण जोहरसोबत गप्पा मारल्या होत्या. त्यावेळी तुला ऐश्वर्याची कोणती गोष्ट आवडत नाही असे करणने श्वेताला विचारले होते. त्यावर तिने लगेचच सांगितले होते की, ऐश्वर्या ही खूप चांगली आई आहे. आज तिने तिच्या स्वतःच्या मेहनतीवर तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिची ही गोष्ट मला सगळ्यात जास्त आवडते. पण तिला फोन केला किंवा तिला मेसेज केला तर त्यावर तिचा लगेचच रिप्लाय कधीच देत नाही. तिची ही गोष्ट मला अजिबातच आवडत  (entertainment) नाही. 


ऐश्वर्या (aishwarya rai) प्रसिद्धीच्या झोतात असताना तिने अभिषेक बच्चन (abhishek bachchan) सोबत लग्न करत तिच्या चाहत्यांना धक्का दिला होता. अभिषेक आणि ऐश्वर्या यांना आराध्या ही मुलगी असून आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्याने चित्रपटात काम करणे खूपच कमी केले आहे. ती जास्तीत जास्त वेळ तिच्या मुलीला देते. खाजगी कार्यक्रमांमध्ये देखील तिच्या मुलीला तिच्यासोबत पाहाण्यात येते. तसेच जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत देखील तिचे नाते खूपच चांगले आहे.