suicide case


ज्येष्ठ समाजसेवक दिवंगत डॉ. बाबा आमटे यांची नात आणि आनंदवनच्या महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे (Dr. Sheetal Amte) यांच्या आत्महत्येमुळे (suicide case) राज्यातील सामाजिक वर्तुळ पुरते हादरून गेले आहे. डॉ. शीतल यांच्यावर सोमवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेबद्दल आमटे कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया आली आहे.


--------------------------------

Must Read

1) इचलकरंजीत पाण्यासाठी महिला आक्रमक

2) ऊर्मिला मातोंडकर यांचा आज शिवसेनेत प्रवेश

3) नव्या कायद्याच्या समर्थनार्थ जाेरदार बॅटींग

4) AUSvsIND : ग्लेन मॅक्सवेलने खेळलेल्या फटक्यावर बंदी घालणे गरजेचे

5) यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची अहमदनगरमध्ये हत्या

6) कर नाही तर, सरनाईकांना ईडी चौकशीची भीती का?

------------------------------------------

सोमवारी संध्याकाळी आनंदवनात डॉ. शीतल (suicide case) यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले होते. अंत्यदर्शनासाठी लोकांची मोठी गर्दी झाली होती. आमटे कुटुंबातील सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी शीतल यांचे चुलत बंधू डॉ. दिगंत प्रकाश आमटे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते फार काही बोलले नाहीत. आमच्यासाठी हे सगळ अत्यंत धक्कादायक आणि अनपेक्षित आहे. आम्ही सर्व जण शॉकमध्ये आहोत. सध्या काहीही सांगण्याच्या मन:स्थितीत नाही, एवढच बोलून हात जोडून दिगंत आमटे निघून गेले.

डॉ. शीतल आमटे या आनंदवनच्या महारोगी सेवा समितीच्या सीईओ होत्या. आनंदवन प्रकल्पातच त्या वास्तव्यास होत्या. गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याची माहिती आमटे कुटुंबीयांनी नुकतीच दिली होती. या वादावर तोडगा काढण्याच्या उद्देशाने डॉ. विकास आणि डॉ. भारती आमटे हे हेमलकसा प्रकल्पात गेले होते. त्यावेळी शीतल या आपल्या खोलीत एकट्याच होत्या. त्यांची प्रकृती बिघडल्याची बाब सासरे आणि पती गौतम यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने त्यांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तपासणीनंतर तेथील डॉक्टरांनी डॉ. शीतल यांना मृत घोषित केले आहे.