sharad pawar
politics news of maharashtra
- शरद पवार (sharad pawar) यांच्या वयाच्या 80 व्या वर्षी सुद्धा देशातील सत्ताधारी पक्ष धसका घेत आहेत. अशा नेत्यांचे आपण सर्व कार्यकर्ते आहोत. एखाद्या 25 वर्षाच्या नेत्याची ज्या पद्धतीने भीती केंद्रातील सत्ताधाऱ्यांना आहे, तीच भीती या क्षणाला सत्ताधारी पक्षाला शरद पवार यांची आहे असे सामाजिक न्यायमंत्री धंनजय मुंडे यांनी म्हटलं आहे. 

ते पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील, खासदार डॉ.अमोल कोल्हे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

------------------------------------------------------------------

Must Read

1) 'या' जिल्ह्यातील पर्यटनस्थळे उद्यापासून खुली करणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

2) मराठा आरक्षणासाठी आजचा दिवस महत्वाचा, घटनापीठसमोर सुनावणी

3) शिक्षण सेवकांची थांबवलेली भरती पुन्हा सुरू होणार !

4) लालबाग सिलिंडर स्फोटप्रकरणी पिता-पुत्रावर मनुष्यवधाचा गुन्हा

5) चार कॅमेऱ्यांचा Vivo Y51 भारतात लॉन्च; अद्ययावत फिचर्ससह बजेट स्मार्टफोन

-------------------------------------------------------------------

“सध्याची लोकशाही फार बदललेली आहे. आजच्या लोकशाहीमध्ये 64 आमदारांचा मुख्यमंत्री होतो, 54 आमदारांचा उपमुख्यमंत्री होतो, 44 आमदारांचा मंत्री होतो आणि 105 आमदार असणारा विरोधी पक्षात बसतो. या लोकशाहीचं उभ्या देशाला दर्शन घडवण्याचं काम शरद पवार यांनी केलं आहे. होत्याच नव्हतं, नव्हत्याच होतं ही म्हण ऐकत होतो. पण, विधानसभेच्या निवडणुकित ज्याचं होत त्याचं नव्हतं कसं झालं आणि ज्याचं नव्हतं त्याचं होतं कसं झालं हे शरद पवार यांनी दाखवून दिलं आहे,” असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं.(politics news of maharashtra)

पुढे ते म्हणाले की, “दिल्लीतसुद्धा श्रवणयंत्र देण्याची गरज आहे असे गणेशजी म्हणाले. ज्या वेळेस यंत्र देऊनसुद्धा श्रवण काम करत नसेल, तेव्हा श्रवणाखाली देण्याची तरतूद असली पाहिजे. जिथं मशीन काम करू शकत नाही तिथं हाताने काम करता आलं पाहिजे”.

“उत्तर भारतात सर्व शेतकरी केंद्र सरकारच्या शेती धोरणाचा विरोधात कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांचं रक्त सांडलं जात आहे. शेतकऱ्यांच्या प्रामाणिक आंदोलनाला सुद्धा बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे यासारखी दुसरी लाजिरवाणी गोष्ट कुठली नाही,” अशी टीका त्यांनी भाजपावर केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वयंपाकघरात शिजणारं अन्नसुद्धा शेतकऱ्याने मेहनतीने, घाम गाळून, रक्त सांडून पिकवलं आहे. आपल्याकडे म्हण आहे, खाल्लेल्या अन्नाला तरी जागा. त्याची जाणीव जर होत नसेल, तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की प्रत्येक्ष कोणी शेती करणारा नसेल. पण, या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पाठीमागे खंबीरपणे राहिलं पाहिले. शेतकरी जिवंत राहील तर तुम्ही आम्ही जिवंत राहू,” अस मुंडे म्हणाले.