sextoys-in-lockdown-and-covid

(Sex Toy) लॉकडाऊनमध्ये सेक्स टॉईजचा (Sex Toy) बाजार वाढला आहे. विशेष म्हणजे भारतासारख्या देशात चीनी कंपन्यांनी शिरकाव केला आहे. भारतात सेक्सटॉईज विक्रीला बंदी असली तरी चीनी कंपन्यांनी भारतीय बाजाराचा अभ्यास करुन चीनी सेक्सटॉईज ऑनलाईन बुकिंगने भारतातील काही शहरात पोहोचवल्या आहेत. पुणे सेक्सटॉईजच्या खरेदीत आघाडीवर असल्याचं सांगण्यात येत आहे. 

या नंतर बंगळुरु आणि मुंबईचा नंबर आहे. तर पुण्यात सेक्सटॉईज ऑर्डर करण्यात पुरुष मंडळी ६५ टक्क्यांच्याही पुढे आहेत. हे प्रमाण लॉकडाऊन दरम्यान वाढलं आहे. केंद्र सरकारने पॉर्न साईटवर बंदी घातली आहे. मात्र ऑनलाईन सेक्स संबंधी माहिती सर्च करणाऱ्या मंडळीला मेसेज किंवा फोननंबर देऊन सेक्स टॉईज खरेदीचा पर्याय उपलब्ध करुन दिला जातो. भारतात सेक्स टॉईज विक्रीवर बंदी असली, तरी घरात सेक्स टॉईज ठेवण्यात बंदी किंवा कायदा नाही.

सार्वजनिक ठिकाणी कुणालाही उत्तेजित करेल अशा प्रकारच्या संपूर्ण उघड्या वस्तुरूप बाहुल्या ठेवण्यास किंवा विक्री करण्यास बंदी आहे. पण अशा वस्तू घरात कुणी वापरत असेल किंवा ठेवत असेल तर त्या वापरण्यास बंदी नाही. कुठल्याही लैंगिक भावना उद्देपित करणारे, अश्लिलतेचं प्रदर्शन करणारे साहित्य मागवणे आणि विक्री करणे हे देखील बेकायदेशीर आहे.

असं साहित्य चीनमधून येत आहे. सेक्स कंटेन्ट (Sex Toy) सर्च करणाऱ्यांना वेबसाईट सुचवल्या जातात, त्या माध्यमातून कोट्यवधी रूपयांचा हा व्यवसाय केला जात आहे. यात स्त्री-पुरूषांच्या लैंगिक अवयवांची प्रतिकृती तसेच स्त्री-पुरुषांच्या नग्न बाहुल्या-डॉल यांचा समावेश आहे. याशिवाय विविध प्रकारचे जेल, तेल, औषधं खपवली जात आहेत. वर्षाकाठी या व्यवसाय कोट्यवधी रूपयांपर्यंत पोहोचत आहे. भारतात सेक्सटॉईजचा व्यवसाय २०२० संपण्याआधी साठेआठशे कोटी रूपयांवर गेला आहे.