India vs Australia test match(India vs Australia) बॉलरनी शानदार कामगिरी केली. पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये कांगारूंच्या तीन विकेट (cricket match) घेतल्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये दोन विकेट घेण्यात भारताला यश आलं. लंचनंतरच्या सत्रात ट्रॅव्हिस हेड (Travis Head)च्या रुपात ऑस्ट्रेलियाने पाचवी विकेट गमावली. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ने हेडला माघारी धाडलं. हेडला 92 बॉलमध्ये 38 रन करता आले. स्लिपमध्ये अजिंक्य रहाणेने हेडचा कॅच पकडला.

भारताला नशिबाने ट्रेव्हिस हेडची विकेट (cricket match) मिळाली. 42 व्या ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहने दोन नो बॉल टाकले होते. या ओव्हरचा दुसरा आणि पाचवा बॉल नो बॉल होता. यानंतर पुढच्याच बॉलला ट्रॅव्हिस हेड आऊट झाला. या ओव्हरमध्ये बुमराहने दोन नो बॉल टाकले त्यामुळे त्याला जास्तीचे दोन बॉल टाकण्याची संधी मिळाली, पण यामुळे भारताला मात्र विकेट मिळाली.

----------------------------------

Must Read

1) इचलकरंजीत जानेवारीमध्ये कोरोना लसीकरणाचे नियोजन

2) मी मात्र कोल्हापूरला परत जाणार' : चंद्रकांत पाटला

3) राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांना फोनवरून दिली धमकी

4) सरकारी नोकरीत अव्वल स्थानी असणारे भारताचे 7 स्टार क्रिकेटपटू

-----------------------------------बुमराहचा ऐतिहासिक नो बॉल

याआधी जसप्रीत बुमराहने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये टाकलेला नो बॉल भारतासाठी घातक ठरला होता. जसप्रीत बुमराह याने पाकिस्तानविरुद्धच्या फायनलमध्ये नो बॉल टाकला होता. हा नो बॉल भारताला चांगलाच महागात पडला होता. बुमराहने टाकलेल्या या नो बॉलवर फकर जमान आऊट झाला होता, पण नो बॉल असल्यामुळे त्याला जीवनदान मिळालं. पुढे फकर जमानने शतक केलं, आणि फायनलमध्ये भारताला पराभूत व्हावं लागलं.