पश्चिम बंगाल (West bangal) सरकारनंतर आता मध्य प्रदेश (Madhya Pradesh) सरकारनेही शालेय मुलांसाठी (School Students) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची कोणतीही परीक्षा न घेता (No Exam) पुढील वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन प्रोजेक्टच्या आधारावर केले जाईल. याशिवाय यावर्षी 5 वी व 8 वीच्या बोर्डाच्या परीक्षादेखील (exam) होणार नाहीत.
31 मार्चपर्यंत शाळा बंद राहणार
Must Read
1) 'या' जिल्ह्यातील पर्यटनस्थळे उद्यापासून खुली करणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
2) मराठा आरक्षणासाठी आजचा दिवस महत्वाचा, घटनापीठसमोर सुनावणी
3) शिक्षण सेवकांची थांबवलेली भरती पुन्हा सुरू होणार !
4) लालबाग सिलिंडर स्फोटप्रकरणी पिता-पुत्रावर मनुष्यवधाचा गुन्हा
5) चार कॅमेऱ्यांचा Vivo Y51 भारतात लॉन्च; अद्ययावत फिचर्ससह बजेट स्मार्टफोन
-------------------------------------------------------------------
यावर्षी पाचवी व आठवीच्या बोर्डाच्या परीक्षा होणार नाहीत, तर दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा घेण्यात येणार असून, त्यासाठी लवकरच वर्ग सुरू होतील, अशी माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे. इयत्ता 9 आणि 11 वीच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा किंवा दोनदा शाळेत बोलावले जाऊ शकते. यापूर्वी, पश्चिम बंगाल सरकारनेही कोणतीही परीक्षा (exam) न घेता राज्यातील सर्व शाळांमधील (school) सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता मध्य प्रदेश सरकारनेही याची घोषणा केली आहे.
महाराष्ट्रातील शैक्षणिक (Maharashtra Education) संस्थेतील काही जिल्ह्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरळीत सुरू झालेले आहेत. दिवसेंदिवस विद्यार्थी संख्या वाढत आहे. सुदैवाने कोरोनाचा कोणत्याही प्रकारच्या प्रार्दुभावाने विद्यार्थी व शिक्षक (Students and Teachers) संक्रमित (Covid-19) झाले नाही ही अत्यंत समाधानकारक बाब आहे. स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसारच राज्यातील इतर जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करेल अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली.