Entertainment center- कलाविश्वातील प्रसिद्ध आणि नावाजलेलं व्यक्तीमत्त्व म्हणजे चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी. आजवर अनेक ऐतिहासिक चित्रपट (film) तयार करुन भन्साळी यांनी जणू कलाविश्वात एक इतिहासच रचला आहे. त्यांच्या चित्रपटातून जणू इतिहासच पुन्हा जिवंत होतो असं म्हटलं जातं. त्यामुळे त्यांच्या चित्रपटांची प्रेक्षक कायमच आतुरतेने वाट पाहत असतात. सध्या भन्साळी त्यांच्या आगामी ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. परंतु, या चित्रपटाव्यतिरिक्त ते लाहोरच्या रेड लाईट एरिया (red light area) हिरा मंडीवर आधारित एक चित्रपट करणार असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

----------------------------------------------------------

Must Read

1) कोल्हापूर : पंचगंगा नदीत अज्ञाताचा मृतदेह; खून की आत्महत्या तपास सुरू

2) `पवारसाहेब, तुम्ही या कामासाठी मला फोन करत जाऊ नका....`

3) TMC मध्ये बंड; ‘या’ आमदाराचा राजीनामा

4) ऊर्मिला मातोंडकर यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक

-------------------------------------------------------

पाकिस्तानच्या लाहोरमध्ये असलेला हिरा मंडी हा रेड लाईट एरिया (red light area) कायमच चर्चेत राहिला आहे. त्यामुळे या विषयावर आधारित चित्रपट (film) करण्याचा निर्णय संजय लीला भन्साळी यांनी घेतल्याचं सांगण्यात येत आहे. हिरा मंडीवर आधारित चित्रपट हा एक पीरियड ड्रामा वेब असून हा वेब चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. २०२१ मध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या नव्या वर्षातच चित्रपटाची अधिकृतरित्या घोषणा केली जाईल असंही सांगण्यात येत आहे.(Entertainment center)

दरम्यान,भन्साळींसाठी हा महत्त्वाचा प्रोजेक्ट असणार आहे. परंतु, याचं दिग्दर्शन मात्र ते करणार नसून विभू पुरी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच हिरा मंडी आणि गंगूबाई काठियावाडी हे दोन वेगवेगळे चित्रपट आहेत.