instagram post
crime news
- इन्स्टाग्रामवर (instagram post)आलेली जाहीरात बघून ऑनलाईन मोबाईल बुकिंग करणाऱ्या शुभम शिवाजी लाड (रा. ज्युबिली कन्या शाळेजवळ, मिरज) या सनदी लेखपालाची साडेचार हजार रुपयांना फसवणूक करण्यात आली. याबाबत त्यांनी मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली असून, अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.

शुभम लाड हे 19 नोव्हेंबर रोजी इन्स्टाग्रामवर ‘TRUSTEDPAGEMOBAIL786’ या इंस्टा पेजवर जाऊन विविध कंपन्यांच्या मोबाईलची जाहिरात (advertise) बघत होते. यापैकी आयफोन 11 प्रो कंपनीचा मोबाईल लाड हे बुक करणार होते. सदर मोबाईल बुकिंग करण्यासाठी 9958194163 हा मोबाईल क्रमांक देण्यात आला होतो. (crime news)

---------------------------------

Must Read

1) इचलकरंजीत पाण्यासाठी महिला आक्रमक

2) ऊर्मिला मातोंडकर यांचा आज शिवसेनेत प्रवेश

3) नव्या कायद्याच्या समर्थनार्थ जाेरदार बॅटींग

4) AUSvsIND : ग्लेन मॅक्सवेलने खेळलेल्या फटक्यावर बंदी घालणे गरजेचे

5) यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची अहमदनगरमध्ये हत्या

6) कर नाही तर, सरनाईकांना ईडी चौकशीची भीती का?

------------------------------------------

यावर संपर्क साधल्यानंतर समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने 9667041332 या नंबर वरून व्हॉट्सअपवर मोबाईलची सर्व माहीती  (instagram post) पाठविली. त्यानंतर याच नंबरवरील पेटीएमवर 30 टक्के रक्कम ऍडव्हान्स पाठविण्यास सांगितले. उर्वरित रक्कम कॅश ऑन डिलिव्हरी करावी, असे सांगितले. त्यानुसार लाड यांनी साडेचार हजार रुपये पाठविले.

मात्र, त्यानंतर संपूर्ण रक्कम भरण्यासाठी तगादा सुरू झाला. पैसे न पाठविल्यास मोबाईल मिळणार नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे लाड यांनी ऍडव्हान्स दिलेले साडेचार हजार रुपये परत मागितले असता पैसे परत मिळणार नाहीत असे सांगून मोबाईल बंद ठेवण्यात आला. त्यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचे लाड यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.