salman-khan-55th-birthdaybhaijan-puts-up-message-

(Birthday) बॉलिवूडचा 'दबंग' सलमान खान (Salman Khan) आज आपला ५५ वा वाढदिवस साजरा करत आहे. भाईजानचा वाढदिवस हा कायमच त्याच्या चाहत्यांसाठी उत्सवाचा दिवस राहिला आहे. पण यंदा देशभरात कोरोनाचं सावट आहे. यामुळे सलमान खानने आपल्या चाहत्यांसाठी एक पत्रक घराबाहेर लावलं आहे. या पत्रकामुळे चाहत्यांचा हिरमोड होणार आहे. 

सलमान खानच्या वाढदिवसादिवशी त्याचे अनेक चाहते वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करतात. (Birthday) चाहते घराबाहेर जमून भाईजानचा वाढदिवस अतिशय धुमधडाक्यात साजरा करतात. सलमान खान देखील मनापासून चाहत्यांच्या शुभेच्छा स्विकारत असतो. पण यंदाचं चित्र काही वेगळं असणार आहे. 

Must Read

1) कळंबा कारागृह मोबाइल प्रकरणात इचलकरंजीने पाच जणांची चौकशी

2) कोल्हापुरात निवडणुकीनंतर महाविकास आघाडी: सतेज पाटील

3) भारताला सुरुवातीलाच दोन धक्के

4) अर्ध्या वयाच्या मुलाशी प्रेमसंबंधाचा शेवट

5) तब्बल 99 टन सोनं मिळाल्याने देशाची अर्थव्यवस्था सुधारणार

6) Vodafone Idea deploys 3G spectrum for 4G services in Mumbaiसलमान खान आपला वाढदिवस पनवेल येथील आपल्या फार्म हाऊसवर साजरा करत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलमान खानने आपल्या यंदाचा वाढदिवस GALAXY इथं साजरा न करता पनवेलच्या फार्महाऊसवर साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यरात्री बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार आणि मित्रांच्या उपस्थितीत सलमानने केक कापला. तसंच आपले बॉडिगार्ड आणि सहकाऱ्यांच्या उपस्थितीतही त्याने एक केक कापला. त्याचे काही फोटो समोर आले आहेत.