rohit sharma re tweet yujvendra chahalभारतीय संघातील आघाडीचा फिरकीपटू युजवेंद्र चहल नुकताच विवाहबंधनात अडकला. गुरुग्राममधील कर्मा लेक रिसॉर्टमध्ये चहल आणि धनश्रीचा पारंपरिक हिंदू रिवाजाप्रमाणे सोहळा पार पडला. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत दोघांचा विवाहसोहळा पार पडला. सोशल मीडियावरुन (social media) चहलने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. त्यानंतर सोशल मीडियावर चहल-धनश्री यांच्यावर शुभेच्छांचा पाऊस पडला. यामध्ये भारतीय संघातील खेळाडूंचाही समावेश होता. रोहित शर्माने (rohit sharma) आपल्या हटके अंदाजात चहलला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.

रोहितने ट्विटरवरून चहलचे ट्वीट रिट्विट (tweet) करत नवीन जोडप्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि एक सल्लाही दिला. रोहितने आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, ‘अभिनंदन भावा! दोघांनाही लग्नाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. तू तुझी गुगली तिला न टाकता विरोधी संघांसाठी राखून ठेव.’ रोहित शर्मानं चहलला केलेलं ट्रोल सध्या सोशल मीडियामध्ये चर्चेचा विषय आहे. चहलनं याआधी रोहित शर्माला अनेकदा ट्रोल केलं होतं. पण आता मात्र ‘हिटमॅन’ने फिरकीपटूला मजेदार शुभेच्छा देत ट्रोल केलं आहे.


आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी युएईला रवाना होण्याआधी चहल आणि धनश्री यांचा साखरपुडा सोहळा पार पडला. धनश्री हे कोरिओग्राफर असून लॉकडाउन काळात दोघांची ओळख झाली. या ओळखीचं रुपांत प्रेमात झालं आणि चहलने धनश्रीला लग्नासाठी मागणी घातली. आयपीएलदरम्यान धनश्री चहलला पाठींबा देण्यासाठी युएईत दाखल झाली होती. हॉटेलमध्ये, मैदानावर चहल आणि धनश्रीचे रोमँटीक फोटो आतापर्यंत आपण सर्वांनी सोशल मीडियावर (social media) पाहिले आहेत.

आयपीएल खेळल्यानंतर चहल ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. तिकडे ३ वन-डे आणि टी-२० सामन्यांची मालिका खेळल्यानंतर चहल भारतात परतला. गेल्या काही दिवसांपासून चहल आणि धनश्री या जोडीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होती.अखेरीस ही जोडी आज विवाहबंधनात अडकली आहे.