leopard


करमाळा तालुक्यातील केडगाव शिवारात ऊसतोड मजुराच्या मुलीचा बिबट्याने (leopard) जीव घेतल्यापासून ऊसतोड मजूर जीव मुठीत धरून दिवस काढत आहेत. केडगाव शिवारात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभाग (rescue team) अथक प्रयत्न करूनही अयशस्वी झाला आहे.

येत्या दोन दिवसांत त्याला जिवंत अथवा मृत पकडणारच, असा निर्धार वन विभागाच्या अधिकार्‍यांनी केला आहे. दरम्यान, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी स्वतः बॅटरी व काठी घेऊन वनअधिकारी यांच्या बरोबर पाहणी (Rohit Pawar inspected the leopard ) केली.

----------------------------------------------------------------

Must Read

1) शरद पवारांकडून पुन्हा चकवा?

2) Alert! जगभरात अनेक ठिकाणी FB मेसेंजर आणि Instagram डाउन

3) GOOD NEWS! आजोबा मुकेश अंबानीचा नातवासोबतचा पहिला खास फोटो

4) मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी खूशखबर

5) गर्लफ्रेंडशी लग्न झालं नाही म्हणून संतापलेल्या बॉयफ्रेंडनं केलं ‘हे’ भयंकर कृत्य

--------------------------------------------------------------------------

करमाळा तालुक्यातील नरभक्षक बिबट्या गेल्या तीन दिवसांपासून गायब झाला असून ड्रोन कॅमेरे, डॉग स्कॉड तसेच ठिकठिकाणी पिंजरे लावून शोधाशोध करणार्‍या प्रशासनालाही बिबट्याने चकवा दिला आहे.

rohit pawar

काल सायंकाळी रोहित पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी उपस्थित वन विभाग अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच, कसल्याही परिस्थितीत बिबट्याचे संकट करमाळा तालुक्यावरून टाळण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी (rescue team) प्राणाची शिकस्त करून हा बिबट्या (leopard)  जेरबंद करावा अशा सूचना रोहित पवारांनी दिल्या.

यादरम्यान त्यांनी स्वतः बॅटरी व काठी घेऊन वनअधिकारी यांच्या बरोबर पाहणी केली. तसेच, बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी दिवस-रात्र प्रयत्नशील आहेत. त्यांना पाठिंबा म्हणून काल करमाळा तालुक्यातील वांगी सांगवी इथे जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला आणि पोलीस व वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी करत असलेल्या कामाची माहिती घेतली. अशी माहिती रोहित पवारांनी फेसबुक पोस्ट (facebook post) करत दिली.