rinku-rajguru-fans-will-appear-hindi-movie

'सैराट' सिनेमानंतर रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) हिने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. इतकंच नाही तर 'सैराट' या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. एका रात्रीत रिंकू महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. सैराटच्या यशानंतर रिंकूने कधीच मागे वळून पाहिलं नाही. या चित्रपटानंतर रिंकू राजगुरूचा फॅन फॉलोव्हिंगदेखील चांगलाच वाढला. रिंकू सोशल मीडियावर सक्रीय असून ती तिथून चाहत्यांशी संवाद साधत असते. रिंकू राजगुरू हंड्रेड या हिंदी वेबसीरिजनंतर आता अॅमेझॉन प्राइमवरील अनपॉज्ड या चित्रपटात दिसणार आहे.

Must Read

अनपॉज्ड या चित्रपटासाठी पाच प्रतिभावंत लोक एकत्र आले आहेत. राज एंड डीके, निखिल आडवाणी, तनिष्ठा चटर्जी, अविनाश अरूण आणि नित्या महरातो यांनी अॅमेझॉन प्राइम व्हिडीओसाठी चित्रपट बनवला आहे. यात पाच लघुपट एकत्रित आणण्यात आले आहेत.  अनपॉज्ड चित्रपट १८ डिसेंबरला रिलीज केला जाणार आहे. यात ग्लिच, अपार्टमेंट, रॅट-ए-टॅट,विषाणू आणि चाँद मुबारक लघुपटांचा समावेश आहे. रॅट ए टॅट या लघुपटात रिंकू राजगुरू पहायला मिळणार आहे. याचे दिग्दर्शन लिलेट दुबेने केले आहे. रिंकूशिवाय तनिष्ठा चॅटर्जीदेखील मुख्य भूमिकेत आहे. 


या शिवाय रिंकू राजगुरूने नुकतेच लंडनमध्ये आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे शूटिंग पूर्ण केले आहे. छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत.


प्रार्थना बेहरे (prathna prayer) , रिंकू राजगुरू, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना यांना एकत्र रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे.