Reliance Jio


देशातील दिग्गज टेलिकॉम कंपनी Reliance Jio ने आतापर्यंत काही नवे प्लॅन युजर्ससाठी लॉन्च केले आहेत. खासियत अशी आहे की, कंपनीने कमी किंमतीपासून ते अधिक किंमचे प्लॅन उपलब्ध असले तरीही ते डेटा आणि अन्य बेनिफिट्स लैस आहेत. ऐवढेच नाही तर कोरोनाच्या काळात घरातून काम करणाऱ्या लोकांच्या सुविधेसाठी कंपनीकडून अतिरिक्त डेटा असणारा वर्क फ्रॉम होम प्लॅन (prepaid plans) सुद्धा लॉन्च केले आहेत. मात्र तुम्हाला माहिती आहे का या प्रीपेड प्लॅनमधील काही असे प्लॅन आहेत ज्यामध्ये युजर्सला बोनस डेटाचा लाभ घेता येणार आहे.

जिओ कंपनीचा 401 रुपयांच्या प्लॅनमध्ये दिवसाला 3GB डेटा मिळणारआहे. मात्र या व्यतिरिक्त कंपनीकडून 6GB बोनस डेटा ही ऑफर केला जात आहे. प्लॅनमध्ये जिओ टू जिओ वर अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1000 मिनिट्स ऑफर केले जात आहेत. 28 दिवसांच्या वॅलिटिडीच्या या प्लॅनमध्ये युजर्सला दिवसाला 100 एसएमएस ही मिळणार आहेत. त्याचसोबत Disney + Hotstar चे सब्सक्रिप्शन ही दिले जाणार आहे.

-----------------------------------

Must Read

1) इचलकरंजीत जानेवारीमध्ये कोरोना लसीकरणाचे नियोजन

2) मी मात्र कोल्हापूरला परत जाणार' : चंद्रकांत पाटला

3) राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांना फोनवरून दिली धमकी

4) सरकारी नोकरीत अव्वल स्थानी असणारे भारताचे 7 स्टार क्रिकेटपटू

-----------------------------------

कंपनीचा 777 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये (prepaid plans) 1.5GB डेली डेटा दिला जाणार आहे. या प्लॅनची वॅलिडिटी 84 दिवसांची असून 5GB बोनस डेटा दिला जाणार आहे. म्हणजेच वॅलिडिटी दरम्यान युजर्सला एकूण 131GB डेटाचा लाभ घेता येणार आहे. या व्यतिरिक्त 100 एसएमएस आणि जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 3 हजार मिनिट्स दिले जाणार आहेत. त्याचसोबत Disney+ Hotsar चे फ्री सब्सक्रिप्शन ही मिळणार आहे.

तसेच जिओचा 2599 रुपयांच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये अतिरिक्त 2GB आणि 10GB डेटा दिला जाणार आहे. म्हणजेच 364 दिवसांच्या या वॅलिडिटी प्लॅनमध्ये युजर्सला एकूण 740GB डेटाचा लाभ घेता येणार आहे. त्याचसोबत यामध्ये Disney+Hotstar चे फ्री एक्सेस ही मिळणार आहे