Redmi 8A dual smartphone


Redmi 8A dual या शाओमी कंपनीच्या बजेट स्मार्टफोनच्या (smartphone) किंमतीत कपात झाली आहे. कंपनीने या फोनच्या किंमतीत दोन हजार रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे हा फोन आता स्वस्तात खरेदी करण्याची चांगली संधी आहे.

शाओमीने Redmi 8A dual या फोनच्या तिन्ही व्हेरिअंटच्या किंमतीत कपात केली आहे. Redmi 8A dual हा फोन म्हणजे कंपनीच्या रेडमी 8A ची पुढील आवृत्ती आहे. या स्मार्टफोनमध्ये गोरिल्ला ग्लास 5, युएसबी टाइप-सी पोर्ट आणि फास्ट चार्जिंग यांसारखे फीचर्स मिळतात. हा फोन सी ब्लू, स्काय व्हाइट आणि मिडनाइट ग्रे या तीन नवीन कलरच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. 

---------------------------------------
Must Read

1) नृसिंहवाडीतील दत्त जयंती सोहळा रद्द

2) ...आणि 'पवारांचे पाय चाटायला कोण गेलं होतं?'

3) Two wheeler : नवीन वर्षात दुचाकी महागणार

4) 2021 च्या वर्षात सर्वाधिक वेळा 'वीकएंड'लाच येणार संकष्टी चतुर्थी

-----------------------------------------

या फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉचसह 6.22-इंच HD+ डिस्प्ले आहे. फोनमध्ये 2Ghz क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 439 प्रोसेसर असून 2 जीबी आणि 3 जीबी रॅमसोबत येणाऱ्या या फोनमध्ये 32 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. शिवाय VoWiFi फीचर देखील आहे. फोटोग्राफीसाठी Redmi 8A dual मध्ये दोन रिअर कॅमेरे आहेत. यात 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर असेल. 

Ai सीन डिटेक्शन आणि Ai पोर्टेट मोड असे फीचर्स कॅमेऱ्यासोबत आहेत. तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. 5000 mAh ची दमदार बॅटरी असलेला हा फोन 18W फास्ट चार्जरसोबत येतो. याशिवाय फोनमध्ये रिव्हर्स चार्जिंगचं फीचरही देण्यात आलं आहे.

किंमत : – हा स्मार्टफोन (smartphone) तीन व्हेरिअंट्समध्ये येतो. 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व्हर्जनची किंमत आतापर्यंत 7,499 रुपये होती पण आता किंमतीतील कपातीनंतर हा फोन 6,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तर, 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व्हर्जन आता 8,299 रुपयांऐवजी 7 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. याशिवाय, 3 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हर्जन आता 8,999 रुपयांऐवजी 8 हजार 299 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. म्हणजेच तिन्ही व्हेरिअंटच्या किंमतीत अनुक्रमे 500 रुपये, 300 रुपये आणि 700 रुपयांची कपात झाली आहे.