_________________________
Must Read
1) सूत दरवाढीविरोधात प्रांताधिकाऱ्यांना गाऱ्हाणे
2)भारत बंद : राज्यात कामगार-बँक संघटना, व्यापारी यांचा पाठिंबा... पण
3) विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेमध्ये मोठा गैरप्रकार
4) विराट कोहलीने रचला इतिहास, वाचा काय आहे हा विक्रम
5) Airtelची उत्तम योजना! दररोज 3 जीबी डेटा, फ्री कॉलिंग आणि Disney+ Hotstar VIP कमी किमतीत उपलब्ध
_______________________________
कोरोना काळात बंद असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेनंतर शैक्षणिक संस्थाचे संस्था प्रमुख, शिक्षण क्षैत्रातील विविध लोकप्रतिनिधी, शाळा मुख्याध्यापक यांनी शिक्षक भरतीवरील बंदी उठवण्याची मागणी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्याकडे केली होती. शिक्षण मंत्र्यांच्या या मागणीला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिसाद दिला.
जिल्हा परिषद आणि खाजगी अनुदानित शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांची रिक्त पदे असून विशेषतः गणित आणि विज्ञान शिक्षकांचा मोठा तुटवडा आहे. तसेच २३ नोव्हेंबर २०२० पासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांची उपस्थीती सातत्याने वाढताना दिसतेय. अशावेळी शिक्षण सेवकांच्या भरतीचा निर्णय होणे गरजेचे होते.
राज्यातील सहा हजार शिक्षकांच्या भरतीस तात्काळ मान्यता देण्यात आली आहे. या मान्यतेनुसार शिक्षण आयुक्तांच्या मार्फत भरती प्रक्रिया सुरू करत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.