sports news- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा (India vs Australia) दारूण पराभव झाला. पहिल्या इनिंगमध्ये 244 रन करणाऱ्या टीम इंडियाचा दुसऱ्या इनिंगमध्ये फक्त 36 रनवर ऑल आऊट झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 90 रनचं आव्हान मिळालं. या आव्हानाचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने अगदी सहज केला. जो बर्न्स याच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने (cricket match)हे आव्हान दोन विकेट गमावून पार केलं, त्यामुळे पहिल्या टेस्टमध्ये कांगारूंचा 8 विकेटने विजय झाला.

मॅचच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये भारताने मॅचवर पकड बनवली होती, पण तिसऱ्या दिवशी एका तासाच्या आत भारताने ही मॅच गमावली. या पराभवाच्या प्रमुख पाच कारणांवर आपण नजर टाकणार आहोत.

------------------------------------------------

Must Read

1) ग्रामपंचायत बिनविरोध करा अन् पंचवीस लाख रूपये मिळवा! आमदारांची ऑफर

2) मोठी घडामोड, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट पत्र

3) रस्त्यात गाडी थांबवून शरद पवारांनी दिले आशीर्वाद

4) ब्लॅकमेल करत तब्बल 21 वर्षे केलं लैंगिक शोषण आणि त्यानंतर...

5) MIM च्या नेत्याने तिघांना घातल्या गोळ्या VIDEO


--------------------------------------------------------

ओपनरची खराब कामगिरी

टेस्ट क्रिकेटमध्ये इनिंगचा पहिला एक तास अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. बॉलची चमक कमी करण्यासाठी आणि खेळपट्टी कशी आहे, हे पाहण्यासाठी ओपनर पहिला एक तास संयमाने खेळतात, पण भारताची ओपनिंग दोन्ही (cricket match) इनिंगमध्ये अपयशी ठरली. केएल राहुल आणि शुभमन गिल याच्याऐवजी टीमने पृथ्वी शॉ याला पसंती दिली. पण पहिल्या इनिंगमध्ये शॉ शून्य रनवर आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 4 रनवर आऊट झाला. दोन्ही वेळा शॉला ऑस्ट्रेलियन बॉलरनी बोल्ड केलं. याशिवाय मयंक अगरवाल यानेही दोन्ही इनिंगमध्ये 40-40 बॉल खेळले, पण त्याला पहिल्या इनिंगमध्ये 17 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 9 रन करता आले.

विराटचा (virat kohli) रन आऊट

मॅचच्या पहिल्या दिवशी विराट कोहली-अजिंक्य रहाणेची जोडी भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेईल, असं वाटत होतं, पण रहाणेच्या चुकीमुळे विराट 74 रनवर रनआऊट झाला आणि मॅच फिरली. विराटची विकेट गेल्यानंतर भारताच्या 7 विकेट फक्त 56 रनवर गेल्या. (sports news)

भारताने सोडले सोपे कॅच

भारताची फिल्डिंगही या मॅचमध्ये अत्यंत खराब झाली. ऑस्ट्रेलियाची पहिली इनिंग लवकर संपली असती, पण भारतीय फिल्डरनी अनेक सोपे कॅच सोडले. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या इनिंगमध्ये 47 रन करणाऱ्या मार्नस लाबुशेनचे तीन कॅच भारताने सोडले. ऋद्धीमान साहा, जसप्रीत बुमराह आणि पृथ्वी शॉ यांनी लाबुशेनला जीवनदानं दिली. याशिवाय टीम पेन याचा कॅचही मयंक अगरवालने सोडला. टीम पेनने पहिल्या इनिंगमध्ये अर्धशतक केलं.

दुसऱ्या इनिंगमध्ये गडगडली बॅटिंग

मॅचच्या दुसऱ्या इनिंगमध्ये भारतीय टीम फक्त 128 बॉलचा सामना करू शकली. हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांनी कोणत्याही भारतीय बॅट्समनला टिकू दिलं नाही. पुजारा, रहाणे आणि अश्विन हे तिन्ही खेळाडू शून्य रन करून माघारी परतले. टीम इंडियाच्या कोणत्याच खेळाडूला दोन अंकी धावसंख्या करता आली नाही. हेजलवूडने 5 तर कमिन्सने 4 विकेट घेतल्या. कमिन्सचा बॉल शमीला लागल्यामुळे तो रिटायर्ड हर्ट झाला आणि भारतीय टीमने फक्त 36 रन केले.

गुलाबी बॉलचा अनुभव नाही

भारतीय टीमचा गुलाबी बॉलने हा दुसराच सामना होता. याआधी बांगलादेशविरुद्ध भारताने एकमेव डे-नाईट टेस्ट खेळली होती. ऑस्ट्रेलियाचा गुलाबी बॉलने खेळण्याचा रेकॉर्ड भारतापेक्षा चांगला आहे.