RBI cancels license of bank in maharashtra


महाराष्ट्रातील आणखी एका बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) कारवाई करण्यात आली आहे. कराड जनता सहकारी बँकेचा परवाना रद्द केल्यानंतर आता आणखी एका बँकेचा (bank) परवाना रद्द करण्यात आला आहे. आरबीआयकडून कोल्हापूरच्या सुभद्रा लोकल एरिया बँकेचा (Subhadra Local Area Bank) बँकिंग परवाना रद्द झाला आहे. बँकेच्या कारभारातील समस्यांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. मनीकंट्रोलने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

२४ डिसेंबरला आरबीआयने बँकेच्या (RBI) गैरकारभारामुळे कोल्हापूरच्या सुभद्रा लोकल एरिया बँकेचा बँकिंग परवाना रद्द करत असल्याची माहिती दिली आहे. गुरुवारपासूनच बँकेचं कामकाज बंद करण्यात आलं आहे. रिझर्व्ह बँकेने आधीच सुभद्रा बँकेच्या व्यवहारावर निर्बंध आणले होते. त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली. दरम्यान यामुळे ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

----------------------------------------
Must Read

1) नृसिंहवाडीतील दत्त जयंती सोहळा रद्द

2) ...आणि 'पवारांचे पाय चाटायला कोण गेलं होतं?'

3) Two wheeler : नवीन वर्षात दुचाकी महागणार

4) 2021 च्या वर्षात सर्वाधिक वेळा 'वीकएंड'लाच येणार संकष्टी चतुर्थी

-----------------------------------------

आरबीआयने कारवाईमागील कारण सांगताना माहिती दिली आहे की, सुभद्रा बँकेचे कामकाज सध्याच्या आणि भविष्यातील ठेवीदारांच्या हितासाठी हानिकारक ठरेल अशा पद्दतीने करण्यात आले होते. अशाच पद्दतीने त्यांना कामकाज सुरु ठेवण्याची परवानगी दिली तर जनतेच्या हितावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आरबीआय यासंबंधी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. दरम्यान सुभद्रा लोकल एरिया बँके सर्व ठेवीदारांची भरपाई करण्यास समर्थ असल्याचं आरबीआयने स्पष्ट केलं आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात बँकेच्या एकूण १३ शाखा आहेत. 2003 मध्ये उद्योगपती अण्णासाहेब मोहिते यांनी या बँकेची स्थापना केली होती.

कराड जनता सहकारी बँकेचा परवाना रद्द

याआधी आरबीआयकडून जनता सहकारी बँकेचा (bank) परवाना रद्द करण्यात आला होता. मोठय़ा रकमेची थकित कर्जे आणि अनागोंदी कारभारामुळे अडचणीत आलेल्या दि कराड जनता सहकारी बँकेचा परवाना रिझव्‍‌र्ह बँकेने अखेर ८ डिसेंबरला रद्द केला. दि कराड जनता सहकारी बँकेच्या सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, मुंबई येथे २९ शाखा असून, जवळपास ३२ हजारांवर सभासद आहेत.

वाढती थकित कर्जे आणि अनागोंदी कारभारामुळे दि कराड जनता सहकारी बँकेवर रिझव्‍‌र्ह बँकेने नोव्हेंबर २०१७ मध्ये निर्बंध आणले होते. त्या वेळी संचालक मंडळ बरखास्त करत प्रशासकाची नियुक्ती केली होती. प्रशासक नियुक्त झाल्याने बँकेच्या एकूणच कामकाजाची छाननी झाली आणि अखेर दि कराड जनता सहकारी बँकेचा परवाना रद्द झाला.