crime news- लैंगिक अत्याचाराच्या (sexual assault) घटनेनं पुणे (Pune) पुन्हा एकदा हादरलं आहे. मावस बहिणींचं अपहरण करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये  (Pimpri chinchwad) समोर आली आहे. 15 डिसेंबर रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दोन नराधमांनी हे कृत्य केलं असून या कामात त्यांना तीन मित्रांनी मदत केली. याप्रकरणी निगडी पोलिसांनी (Nigdi Police) पाचही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. दोन्ही पीडित मुली अल्पवयीन आहेत.

आशिष सरोदे (वय-20), करण साबळे (वय-21), निवास सुतार (वय-20), तेजस वाघमारे (वय-19) आणि कार्तिक उर्फ टिंक्या चव्हाण (वय-21) अशी आरोपींची नावं आहेत. 

----------------------------------------------------------

Must Read

1) कोल्हापूर : पंचगंगा नदीत अज्ञाताचा मृतदेह; खून की आत्महत्या तपास सुरू

2) `पवारसाहेब, तुम्ही या कामासाठी मला फोन करत जाऊ नका....`

3) TMC मध्ये बंड; ‘या’ आमदाराचा राजीनामा

4) ऊर्मिला मातोंडकर यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक

-------------------------------------------------------

मिळालेली माहिती अशी की, आरोपी आशिष सरोदे आणि करण साबळे या दोघांनी एका मुलीवर बलात्कार केला तर दुसरीचा विनयभंग केला. त्यानंतर नराधमांनी आपल्या तीन मित्रांना बोलावून त्यांच्या मदतीनं मुलींचं अपहरण केलं. मात्र, स्थानिक नागरिकांमुळे त्यांचा कट फसला. आरोपींनी दोन्ही पीडितांना रस्त्यावर सोडून पळ काढला. मात्र, पोलिसांनी नराधमांना अवध्या काही तासांतच जेरबंद केलं. (crime news)

काय आहे प्रकरण?

पिपंरी चिंचवडमधील अजंठा नगरमध्ये 15 डिसेंबरला रात्री दोन्ही मावस बहिणी खेळत होत्या. आरोपी आशिष सरोदे आणि करण साबळे हे दोघं तिथं आले. आरोपींनी दोन्ही पीडितांची विचारपूस केली. नंतर आंधाराचा फायदा घेत घराशेजारी असलेल्या जुन्या कंपनीच्या परिसरात नेऊन आरोपी आशिष सरोदे यांनी एका मुलीवर बलात्कार केला तर दुसरा आरोपी करण साबळे यानं दुसऱ्या पीडितेवर बलात्काराचा प्रयत्न केला. तरी देखील नराधम थांबले नाहीत, त्यांनी दोन्ही पीडितांना जुन्या पुणे-मुंबई हायवेवर आणलं. आपल्या तिन्ही मित्रांनी तिथं बोलावलं. नंतर कारमध्ये पीडितांना जबरदस्तीनं बसवून त्यांच अपहरण केलं. मात्र, चिंचवड स्टेशन चौकात वाहतूक पोलिसांनी कार थांबवली असता आरोपींनी दोन्ही पीडितांना रस्त्यवर उतरवून पाचही आरोपी पसार झाले.