raju shettipolitics criticism- भाजपचे आमदार आशिष शेलार आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हातात सत्तासुंदरी नसल्यामुळे ते सैरभैर झाले आहेत. त्यामुळे त्याची अवस्था देवदासासारखी झाली आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. 

भाजपाच्यावतीने काढण्यात आलेल्या शेतकरी आत्मनिर्भर यात्रेत शेलार व दरेकर यांनी शेट्टी यांच्यावर टीका केली होती. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने शेट्टी कोल्हापुरात होते, त्यावेळी त्यांनी या टिकेला प्रत्युत्तर दिले.

-----------------------------------

Must Read

1) इचलकरंजीत जानेवारीमध्ये कोरोना लसीकरणाचे नियोजन

2) मी मात्र कोल्हापूरला परत जाणार' : चंद्रकांत पाटला

3) राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांना फोनवरून दिली धमकी

4) सरकारी नोकरीत अव्वल स्थानी असणारे भारताचे 7 स्टार क्रिकेटपटू

-----------------------------------

आत्मनिर्भर यात्रेच्या माध्यमातून कृषी कायदे कसे महत्वाचे आहेत? शेती क्षेत्राच्या दृष्टीने कसे हिताचे आहेत, हे सांगण्यासाठी आत्मनिर्भर यात्रेचे आयोजन भाजपने केले होते. मात्र त्यांना हे पटवून सांगता आले नाही. आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार आहे, असा टोलाही शेट्टी यांनी लगावला. वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यासाठी आत्मनिर्भर यात्रेचे नौटंकी भाजपने केली, असेही श्री. शेट्टी म्हणाले. मात्र शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवल्याने हे सगळे सैरभैर झाले आहेत. ही यात्रा फसलेली असून या तिन्ही कायद्यांना शेतकऱ्यांचा विरोध (politics criticism) आहे.

कोटीचा दंड भरायचा का?

भाजप सरकारचे शेतकऱ्यांच्या वरील प्रेम बाहेर पडत आहे. पंजाब मधील शेतकऱ्यांनी पाचोळा जाळला तर त्यांना एक कोटीचा दंड ठोठावण्यात आला आहे. उद्या महाराष्ट्रात उसाचा फड पेटवला तर एक कोटी दंड भरायचा का? असा सवाल शेट्टी यांनी केला.