minimum balance in the post office savings account.

 11 डिसेंबरपर्यंत टपाल कार्यालयात किमान शुल्क ठेवणं आवश्यक आहे.किमान पाचशे रुपये शुल्क जमा करावं लागणार आहे. 11 डिसेंबरपूर्वी तसं न केल्यास खातेधारकांना त्याचा मेंटेनन्स चार्ज भरावा लागणार आहे.

पोस्ट ऑफिस (post office) च्या बचत खात्यात किमान रक्कम शिल्लक ठेवणं आता बंधनकारक आहे. जर आपण आपणास मेंटेनन्स भरायचा नसेल तर 11 डिसेंबर 2020 पूर्वी आपल्या खात्यात पाचशे रुपये भरणं गरजेचे आहे, इंडियन पोस्टने आपल्या ग्राहकांना पाठवलेल्या मेसेजमध्ये सांगितलं आहे.

---------------------------------

Must Read

1) इचलकरंजीत पाण्यासाठी महिला आक्रमक

2) ऊर्मिला मातोंडकर यांचा आज शिवसेनेत प्रवेश

3) नव्या कायद्याच्या समर्थनार्थ जाेरदार बॅटींग

4) AUSvsIND : ग्लेन मॅक्सवेलने खेळलेल्या फटक्यावर बंदी घालणे गरजेचे

5) यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची अहमदनगरमध्ये हत्या

6) कर नाही तर, सरनाईकांना ईडी चौकशीची भीती का?

------------------------------------------

इंडियन पोस्टच्या अधिकृत वेबसाइटच्या म्हणण्यानुसार आर्थिक वर्षाच्या अखेरीस खात्यात किमान 500 रुपये न ठेवल्यास 100 रुपये मेंटेनन्स चार्ज प्रत्येक खातेधारकाला भरावा लागणार आहे. जर खात्यात पैसे शिल्लक नसतील तर त्यांचं खातं आपोआप बंद केलं जाणार आहे.

बचत खात्याअंतर्गत ग्राहकांना 4% दराने वार्षिक व्याज मिळतं. दहा हजार रुपयांपर्यंतचे व्याज पूर्णपणे करमुक्त आहे. या खात्यात किमान 500 रुपये शिल्लक असणं गरजेचं आहे. बचत खातं चालू ठेवण्यासाठी तीन आर्थिक वर्षांत किमान एक व्यवहार करणं आवश्यक आहे.

तसंच हे खातं मुलांच्या नावे उघडलं जाऊ शकतं. 10 वर्षानंतर कोणतंही मूल स्वतःचं खातं चालू करू शकतं. एकत्रितपणे दोन लोक जॉइंट अकाउंटसुद्धा उघडू शकतात. आपण एक किंवा अधिक खातीदेखील उघडू शकता.

पोस्ट ऑफिस बचत खात्यात ग्राहकांना एटीएम, चेक, मोबाईल बँकिंग (mobile banking) अशा अनेक सुविधा मिळतात. त्यामुळे आता व्यवहार करणं अधिकच सोपे झाले आहे.