post-office-news-saving-account

इंडिया पोस्ट (India Post) ने पोस्ट ऑफिस बचत खात्यामधील मिनिमम बॅलन्स (Post Office Savings Account) जमा करण्यासाठीची डेडलाइन निश्चित केली आहे. इंडिया पोस्टने शुक्रवारी याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. या ट्वीटनुसार पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यामध्ये कमीतकमी शिल्लक 500 रुपये जमा असणं आवश्यक आहे. 11 डिसेंबरपर्यंत तुमच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यात ही रक्कम जमा असणं आवश्यक आहे.

___________________________

Must Read

1) अभिनेता स्वप्नील जोशीचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक

2) HDFC बँकेला मोठा झटका!

3) हरभजनने केली कोरोना लसीची मस्करी, IPS अधिकाऱ्याने सुनावलं

4) PUBG Mobile India भारतात लॉन्च होणार का नाही? कंपनीने दिलं उत्तर

5) विराटच्या सहाय्यकाचे अखेर विलगीकरण संपले

6) लॉकडाऊनमध्ये सेक्स टॉईजचा बाजार वाढला...हे शहर आघाडीवर...

_____________________________

याआधी इंडिया पोस्टने त्यांच्या ग्राहकांना याबाबत आठवण करून देणारा मेसेज देखील पाठवला होता. पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स असणं अनिवार्य आहे, असं या मेसेजमधून सांगण्यात आलं होतं. जर तुम्हाला मेंटेनन्स चार्ज द्यायचा नसेल तर 11 डिसेंबर 2020 आधी तुमच्या खात्यामध्ये कमीतकमी 500 रुपये जरुर मेंटेन करा.


काय आहे सध्याचा नियम?

इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइटनुसार, जर आर्थिक वर्षाच्या अखेरीस तुमच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यामध्ये कमीतकमी शिल्लक नसेल तर तुमच्याकडून 100 रुपयांचे मेंटेनन्स शुल्क कापले जाईल. जर खात्यामध्ये अजिबात रक्कम नसेल तर ते आपणहून बंद होईल.

पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते व्यक्तिगत किंवा संयुक्त स्वरुपात कोणतीही प्रौढ व्यक्ती सुरू करू शकते. अल्पवयीन मुलांसाठी देखील त्यांचे पालक त्यांच्या नावे खातं उघडू शकतात. एखाद्या व्यक्तीच्या नावावर केवळ एक पोस्ट ऑफिस सेव्हिंग खातं उघडता येतं. हे खाते उघडताना नॉमिनीचं नाव देणं अनिवार्य आहे.

पोस्टामध्ये काय आहे व्याजदर?

व्यक्तिगत किंवा संयुक्त स्वरुपात पोस्ट ऑफिसमध्ये बचत खात्यासाठी सध्या 4 टक्के दराने व्याज मिळते आहे. या खात्यावर मिळणारे व्याज महिन्याची 10 तारीख आणि शेवटची तारीख या दरम्यान असणाऱ्या शिल्लक रकमेच्या (Minimum Balance) आधारावर निश्चित केलं जातं. जर या दरम्यान एखाद्याच्या खात्यामध्ये 500 रुपयांपेक्षा कमी शिल्लक रक्कम असेल तर त्यावर व्याज मिळत नाही.