politics news of maharashtra - raju shettipolitics news of maharashtra- केंद्र सरकारने आणलेले कृषी विधेयक शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे आहे. लॉकडाउनच्या काळात काही मंत्र्यांनी घेतलेला चुकीचा निर्णय शेतकऱ्यांवर लादला जात आहे. याविरुद्ध दिल्लीत शेतकरी थंडीत कुडकुडत आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्या तत्काळ मान्य केल्या पाहिजेत, अन्यथा देशभर वणवा पेटेल, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी (raju shetti) यांनी दिला. ‘भारत बंद’च्या पार्श्‍वभूमीवर बिंदू चौकात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

भांडवलदारांच्या हातचे खेळणे बनलेले मोदी सरकार नेस्तनाबूत करा, असे आवाहन विविध पक्ष, संघटनांच्या ठिय्या आंदोलनावेळी वक्‍त्यांनी केले. यावेळी चले जाव-चले जाव मोदी सरकार चले जावो, अशा जोरदार घोषणा दिल्या. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय (गवई गट), शेकाप, लालनिशाण, आम आदमी पक्षासह इतर संघटनांचे कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले. 

---------------------------------------------

Must Read

1) 'या' जिल्ह्यातील पर्यटनस्थळे उद्यापासून खुली करणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

2) मराठा आरक्षणासाठी आजचा दिवस महत्वाचा, घटनापीठसमोर सुनावणी

3) शिक्षण सेवकांची थांबवलेली भरती पुन्हा सुरू होणार !

4) लालबाग सिलिंडर स्फोटप्रकरणी पिता-पुत्रावर मनुष्यवधाचा गुन्हा

5) चार कॅमेऱ्यांचा Vivo Y51 भारतात लॉन्च; अद्ययावत फिचर्ससह बजेट स्मार्टफोन

-------------------------------------------------

केंद्र सरकारने (central government) शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करावा. आंदोलनाबाबत उलट-सुलट टीकाटिप्पणी केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचा संयम सुटत आहे. त्यामुळे, उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या बाजूचा निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा अखिल किसान संघर्ष समितीने दिला. (politics news of maharashtra)

माजी आमदार संपतराव पवार-पाटील म्हणाले, ‘‘प्रत्येकवेळी शेतकरीच (farmers) पिचला जात आहे. केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे शेतकऱ्यांना हानिकारक आहेत.’’उदय नारकर म्हणाले, ‘‘देशात मोदींची मुजोर सत्ता आहे. बळिराजाला गाढण्याचे सरकार काम करत आहे.’’जिल्हाध्यक्ष विजय देवणे म्हणाले, ‘‘ज्या-ज्यावेळी या देशात दादागिरी केली जाते. त्या-त्या वेळी त्यांची दादागिरी उतरवण्याचे काम जनतेने केले आहे.’’

अतुल दिघे म्हणाले, ‘‘कामगार कायदे मोडल्यामूळे कामगारांचे नुकसान झाले. त्यांच्या उत्पन्नामध्ये घट झाली आहे. भांडवदारांच्या हातचे खेळणे बनलेले मोदी सरकार नेस्तानाबूत 

केले पाहिजे.’’सतीशचंद्र कांबळे म्हणाले, ‘‘केंद्र सरकारने केलेले कायदे म्हणजे शेतकऱ्यांसाठी काळा दिवसच आहे.’’