politics news of maharashtra- जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर केवळ सत्ताधारी सदस्यांना निधी देऊन व विरोधकांना डावलून विकास होणार नाही. त्यामुळेच पुढील काळात ग्रामविकास विभाग असो की जिल्हा नियोजन मंडळातून येणारा निधी सर्वच सदस्यांना समान निधी दिला जाईल, असे आश्‍वासन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांनी दिले. जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीनंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

पालकमंत्री सतेज पाटील (satej patil) यांच्यासह खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबीटकर, आमदार जयंत आसगावकर, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल व सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. 

-------------------------------------------------

Must Read

1) ग्रामपंचायत बिनविरोध करा अन् पंचवीस लाख रूपये मिळवा! आमदारांची ऑफर

2) मोठी घडामोड, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट पत्र

3) रस्त्यात गाडी थांबवून शरद पवारांनी दिले आशीर्वाद

4) ब्लॅकमेल करत तब्बल 21 वर्षे केलं लैंगिक शोषण आणि त्यानंतर...

5) MIM च्या नेत्याने तिघांना घातल्या गोळ्या VIDEO


--------------------------------------------------------


पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, ""लोकशाहीत मोर्चा काढणे नागरिकांचा अधिकार आहे. मात्र सतत मोर्चा काढणे व आंदोलन करण्याने जिल्ह्याची ओळख बदलत आहे. मात्र मुश्रीफ व आपण जनता दरबारचा संकल्प केला आहे. लोकांचे प्रश्‍न या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न असून त्याला प्रतिसाद मिळत (politics news of maharashtra)आहे.'' 

हसन मुश्रीफ व सतेज पाटील दोन्ही मंत्री ताकतीचे आहेत. विकासकामांचा मोठा आवाका आहे. मात्र मंत्री असल्याने निधीचा पूर या दोन्ही तालुक्‍यांकडेच आहे. दांडा तिकडे खोरं ओढतं, हे खरं असलं तरी इतर तालुक्‍यांनाही संधी मिळणे आवश्‍यक आहे. त्यामुळे आता कागल व करवीर हे दोन्ही तालुक्‍यांची जिल्हा म्हणून घोषणा करावी म्हणजे इतर तालुक्‍यांनाही निधी मिळेल, असा टोला खासदार धैर्यशील माने यांनी लगावला. त्यांच्या या वक्‍तव्याला सभागृहाने भरभरून दाद दिली. 

राजकारणाची पाठशाळा 

जिल्हा परिषद राजकारणाची पाठशाळा आहे. जिल्ह्याचे विविध प्रश्‍न समजून घेता आले. राजू शेट्टी सदस्य असताना सतत उसाच्या प्रश्‍नावर लक्ष वेधायचे. पुढे ते संसदेत गेले. धैर्यशील माने यांनाही संसदेत जाण्याची संधी मिळाली. आपणालाही जिल्हा परिषदेच्या अनुभवाचा फायदा विधानसभेत काम करताना होत आहे. त्यामुळे या सभागृहात येणाऱ्या सदस्यांनी अभ्यासपूर्ण काम करावे, असे आवाहन आमदार प्रकाश आबीटकर यांनी केले. 

विधान परिषद असल्याने भरपूर निधी 

यावर्षी विधानपरिषद निवडणूक पालकमंत्री सतेज पाटील लढवणार आहेत. त्यामुळे सदस्यांच्या मतांची गरज आहे. म्हणूनच या वेळी जिल्हा नियोजनकडून भरपूर निधी दिला जाणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगताच सभागृहात हशा पिकला.