150-electronic-buses-from-evey-to-pmpml

( Electric bus) नवी वर्षांत पुणेकरांना पुणे महापालिकेनं नवीन भेट दिली आहे. पुणे शहराच्या शहर बस वाहतूक असलेल्या पीएमपीएमएलच्या ताफ्यात 150 नव्या इलेक्ट्रिक बसेस (Electric busयेणार आहे.  भारत सरकारच्या फेम-2 योजनेंतर्गत इलेक्ट्रिक बस उत्पादनात अग्रणी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक आणि एव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड (EVEY) यांना पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून 150 इलेक्ट्रिक बस पुरवण्यासाठीची ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे वर्षभरात पीएमपीएमएलच्या ताफ्यात EVEY ट्रान्स या 150 इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहे.

'पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएल) ने 12 मीटर लांबीच्या 150 इलेक्ट्रिक बसची मागणी आमच्याकडे केली आहे, ओजीएल / EVEY ने  पुण्यात याआधीच दिलेल्या 150 बसेस रस्त्यावर सेवा बजाबत आहेत आणि या नव्या ऑर्डरमुळे इलेक्ट्रिक बसेसच्या ताफ्याचा आकार 300 पर्यंत जाईल जो देशातील सर्वाधिक आहेत. ओजीएल आणि ईव्हीवाय ट्रान्स या दोघांसाठीही हा अभिमानास्पद क्षण आहे, ”असं ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडचे सीईओ आणि सीएफओ शरत चंद्र यांनी सांगितले.

प्रवाशांना सुखसोयीसाठी या 12 मीटर लांबीच्या वातानुकूलित बसेसमध्ये इलेक्ट्रॉनिक्स नियंत्रित एअर सस्पेंशन आहे.  बसण्यासाठी 33 आसने व्हीलचेयर चालक अशी सोय आहे.  तसंच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे व्हीलचेयर, आपत्कालीन बटन, मोबाईल चार्जिंगसाठी यूएसबी सॉकेट्स बसवण्यात आली आहेत. बसमध्ये बसवलेल्या लिथियम-आयन बॅटरीमुळे  एका चार्ज मध्ये जवळ जवळ 200 किमी पेक्षा अधिक (Electric busअंतर ऑलेक्ट्रा कापू शकते. या अत्याधुनिक  इलेक्ट्रिक बसमध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम आहे, ज्यामुळे ब्रेक लावल्यावर तयार होणाऱ्या उर्जेचा विनीयोग बसमध्ये केला जातो. हाय-पॉवर चार्जिंग सिस्टम बॅटरीला 2-5 तासांच्या दरम्यान पूर्ण रिचार्ज करते.

ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड (एमईआयएल समुहाची कंपनी) MEIL  समुहाचा भाग असलेली सन 2000 मध्ये सुरू झालेली, ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडने (ऑलेक्ट्रा सार्वजनिक सूचीबद्ध कंपनी आहे) 2015 मध्ये  इलेक्ट्रिक बसेस भारतात आणल्या.  पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन नेटवर्कसाठी लागणारे सिलिकॉन रबर / कम्पोझिट इन्सुलेटर बनवणारी ओलेक्ट्रा ग्रीनटेक ही  भारतातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे.