petrol-diesel-price-todayPetrol-diesel-price-todayगेल्या १२ दिवसांपासून पेट्रोल (petrol) -डिझेल (Diesel) च्या किंमतीत सतत वाढ होताना दिसत आहे. २० नोव्हेंबरपासुन पेट्रोल-डिझेलचे दर वाढतच आहेत. आज पेट्रोल प्रतिलिटर २० पैशांनी तर डिझेलचे दर जवळपास प्रतिलिटर २४ पैशांनी वाढले आहेत. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर २० पैशांनी वाढले असून डिझेलच्या दरांत २३ पैशैंची वाढ झाली आहे. दिल्लीत गुरूवारी पेट्रोल दर ८२.६६ रूपये ऐवढे होते. पण आज मात्र पेट्रोलचे दर पुन्हा वधारले आहेत. आज पेट्रोलचा भाव ८२. ८६ प्रति लीटर असा आहे. 

___________________________

Must Read

1) अभिनेता स्वप्नील जोशीचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक

2) HDFC बँकेला मोठा झटका!

3) हरभजनने केली कोरोना लसीची मस्करी, IPS अधिकाऱ्याने सुनावलं

4) PUBG Mobile India भारतात लॉन्च होणार का नाही? कंपनीने दिलं उत्तर

5) विराटच्या सहाय्यकाचे अखेर विलगीकरण संपले

6) लॉकडाऊनमध्ये सेक्स टॉईजचा बाजार वाढला...हे शहर आघाडीवर...

_____________________________

त्याचप्रमाणे मुंबईत देखील पेट्रोलच्या किंमतीत १९ पैशांची वाढ झाली आहे. आज मुंबईत पेट्रोलचे दर ८९.५२ रूपये प्रति लिटर पर्यंत पोहोचले आहेत. तर डिझेलसाठी ग्राहकांना ७९.६६ रूपये मोजावे लागत आहे. 

चेन्नईतील लोकांना एक लिटर पेट्रोलसाठी ८५.५९ आणि डिझेलसाठी ७८.४५  रुपये मोजावे लागतील. तर कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत ८५.७६ आणि डिझेलची किंमत रुपयांवर ७६.६४ पोहोचली आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर SMSच्या माध्यमातून देखील जाणून घेता येऊ शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून 9224992249 या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. बीपीसीएलचे ग्राहक RSP लिहून 9223112222 तर एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122  या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात.

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात. सकाळी 6 वाजल्यापासून नवी दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.