tapasee pannuentrainment center- संगीतकार यशराज मुखाते याने मालिकेतीन संभाषणावर तयार केलेल्या ‘बिगीनी शूट’ रॅप साँगने सध्या बॉलिवूड सेलिब्रिटींना क्रेजी केले आहे. या साँगवर बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटी थिरकताना दिसत आहेत. यापैकीच एक कोण तर तापसी पन्नू (tapasee pannu) . तापसीच्या या डान्स व्हिडीओने (instgram post)चाहत्यांनाच नाही तर चक्क दीपिका पादुकोणलाही वेड लावले. इतके की, तापसीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर दीपिका तापसीची फॅन झालीये.  

__________________________

Must Read

1) सूत दरवाढीविरोधात प्रांताधिकाऱ्यांना गाऱ्हाणे

2)भारत बंद : राज्यात कामगार-बँक संघटना, व्यापारी यांचा पाठिंबा... पण

3) विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेमध्ये मोठा गैरप्रकार

4) विराट कोहलीने रचला इतिहास, वाचा काय आहे हा विक्रम

5) Airtelची उत्तम योजना! दररोज 3 जीबी डेटा, फ्री कॉलिंग आणि Disney+ Hotstar VIP कमी किमतीत उपलब्ध

_______________________________

राजीव मसंद यांना दिलेल्या मुलाखतीत दीपिकाने तापसीच्या या डान्स व्हिडीओचे इतके कौतुक केले की, ऐकणाराही हैराण होईल.‘तापसीचा (tapasee pannu )तो व्हिडीओ म्हणजे, या वर्षातील माझा सर्वात  परफॉर्मन्स आहे. मी तापसीची आधीपासूनच फॅन आहे. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मी तिची आणखी मोठी फॅन झालीये. 2020 चा बेस्ट परफॉर्मन्स अवार्ड देण्याची जबाबदारी माझ्यावर कोणी सोपवलीच तर मी तो अवार्ड तापसीला देईन,’ असे दीपिका म्हणाली.(entrainment center)


तापसीने हा व्हिडीओ (instgram post)मालदीवमध्ये शूट केला होता. नुकतीच ती बहिणींसोबत मालदीवला व्हॅकेशनवर गेली होती. यादरम्यान तिने ‘बिगिनी शूट’वर डान्स केला होता. यात तापसीचा बॉयफ्रेन्ड मॅथियास बोय याची एक झलकही दिसली होती.

‘बिगीनी शूट’ हा डायलॉग ‘इमोशनल अत्याचार’ या रिअ‍ॅलिटी शोमधील आहे. या शोमध्ये आलेल्या एका स्पर्धक तरूणीने मुलाखतीदरम्यान  उच्चारलेली वाक्य गोळा करुन यशराज  मुखातेने ‘बिगीनी शूट’ या गाण्याची निर्मिती केली. हे गाणे सोशल मीडियावर इतके हिट झाले. बॉलिवूड सेलिब्रिटींनाही या गाण्याने वेड लावले. 

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, दीपिका पादुकोण लवकरच ‘83’ या सिनेमात दिसणार आहे. याशिवाय शकुन बत्राच्या एका सिनेमातही ती झळकणार आहे. यात ती सिद्धांत चतुर्वेदीसोबत दिसेल. तापसीचे म्हणाल तर सध्या ती ‘रश्मी रॉकेट’ या सिनेमात बिझी आहे.