opposite-leader-party-together-run-election-null-kolhapur

(Politics News) माजी आमदार ॲड. श्रीपतराव शिंदे यांच्या नूल (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत (Gram Panchayat Electionराष्ट्रवादी आणि जनता दल हे दोन पारंपरिक विरोधक यावेळीही एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीत दोन गट पडल्याने राजकारणाने नवे वळण घेतले आहे. परिणामी ही निवडणूक चुरशीची होणार आहे. निवडणूक दुरंगी की तिरंगी होणार याचीही उत्सुकता आहे.

गतवेळच्या निवडणुकीत पारंपरिक विरोधक असलेल्या जनता दल आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन माजी आमदार ॲड. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आघाडी केली. भाजप-शिवसेना युतीला हरवून आघाडीने निर्विवाद वर्चस्व मिळविले. आता राष्ट्रवादीत जयसिंग चव्हाण व जितेंद्र शिंदे असे दोन गट तयार झालेत. (Politics News) शिवपार्वती दूध संस्थेच्या निवडणुकीपासून एकमेकापासून दुरावलेले जयसिंग चव्हाण व पी. एम. चव्हाण आणि माजी सभापती इक्‍बाल काझी यांनी एकत्र येत जनता दलालाबरोबर आघाडी करून निवडणूक लढविण्याची तयारी चालवली आहे. त्याला काझी यांनी दुजोराही दिला.

Must Read

1) कळंबा कारागृह मोबाइल प्रकरणात इचलकरंजीने पाच जणांची चौकशी

2) कोल्हापुरात निवडणुकीनंतर महाविकास आघाडी: सतेज पाटील

3) भारताला सुरुवातीलाच दोन धक्के

4) अर्ध्या वयाच्या मुलाशी प्रेमसंबंधाचा शेवट

5) तब्बल 99 टन सोनं मिळाल्याने देशाची अर्थव्यवस्था सुधारणार

6) Vodafone Idea deploys 3G spectrum for 4G services in Mumbai


पाच वर्षात जनता दलाने सापत्न वागणूक दिल्याने यावेळी स्वतंत्र आघाडी करण्याचा विचार शिंदे यांनी बोलून दाखविला. कोण येतील त्यांना सोबत घेऊन निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. जनता दलाचा बालेकिल्ला म्हणून नूल गावची ओळख आहे. गावच्या निवडणुकीत ॲड. शिंदेंची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भक्कम आघाडीची रचना करून त्यांना कडवे आव्हान उभे करण्याच्या हालचालीही सुरू आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आणण्यासाठी जुनी मंडळी प्रयत्नशील आहेत. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र होणार की नाही, बाजार समितीचे माजी सभापती श्रीरंग चौगुले यांच्यासह मल्हार शिंदे व डॉ. स्वप्नील शिंदे यांची भूमिका काय राहणार?, याकडे लक्ष आहे.