Oppo F17 Protechnology- Oppo कंपनीचा स्मार्टफोन Oppo F17 Pro आता स्वस्त झालाय. कंपनीने या फोनच्या किंमतीत कपात केली आहे. कंपनीने सप्टेंबरमध्ये Oppo F17 Pro भारतात लाँच केला (oppo smartphone) होता. लाँच झाल्यापासून पहिल्यांदाच या फोनच्या किंमतीत कपात झाली आहे.

__________________________

Must Read

1) सूत दरवाढीविरोधात प्रांताधिकाऱ्यांना गाऱ्हाणे

2)भारत बंद : राज्यात कामगार-बँक संघटना, व्यापारी यांचा पाठिंबा... पण

3) विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेमध्ये मोठा गैरप्रकार

4) विराट कोहलीने रचला इतिहास, वाचा काय आहे हा विक्रम

5) Airtelची उत्तम योजना! दररोज 3 जीबी डेटा, फ्री कॉलिंग आणि Disney+ Hotstar VIP कमी किमतीत उपलब्ध

_______________________________

Oppo F17 Pro स्पेसिफिकेशन्स :-

Oppo F17 Pro मध्ये 6.43 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आणि ऑक्टाकोर मीडिया टेक हीलियो P95 प्रोसेसर आहे. oppo smartphone Android 10 ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करतो. यात ColorOS 7.2 चा इंटरफेस आहे. ड्युअल पंच-होल कॅमेऱ्यासह येणाऱ्या या फोनमध्ये सेल्फीसाठी 16 मेगापिक्सेल प्रायमरी + 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर असलेला फ्रंट कॅमेरा आहे. तर, मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. 

यात 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सेल वाइड-अँगल लेन्स, 2 मेगापिक्सेल मोनोक्रोम सेन्सर आणि 2 मेगापिक्सेलचा पोट्रेट सेन्सर आहे. 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या या फोनमध्ये कंपनीने फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 4000mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. तर, कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये 4G VoLTE, वाय-फाय, ब्लूटूथ v5.1, जीपीएस/ए-जीपीएस, 3.5mm चा हेडफोन जॅक आणि युएसबी टाइप-सी पोर्ट आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरही मिळेल.

नवीन किंमत :-

Oppo F17 हा फोन आता 1,500 रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्यामुळे Oppo F17 Pro तुम्ही आता 21,490 रुपयांमध्ये खरेदी करु शकतात. यापूर्वी या फोनची किंमत 22,990 रुपये होती.