on-which-day-will-angaraki-sankashti-chaturthi

संकष्टी चतुर्थीचा (Sankashti Chaturthiअर्थ दुः खाचा पराभव करणारा असा होतो. संकष्टी चतुर्थी हा सण लाडक्या गणपतीला समर्पित केलेला आहे. या दिवशी गणपतीची पूजा केली जाते, यामुळे घरात प्रसन्न वातावरण बनतं. हिंदू पंचांगानुसार संकष्टी चतुर्थीचा व्रत कृष्ण पक्ष चतुर्थीला ठेवला जातो. आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपतीला प्रथम देव मानलं आहे, म्हणून प्रत्येक शुभ कार्यापूर्वी आपण गणपतीची पूजा करतो. चतुर्थी तिथी गणपतीची मानली जाते, म्हणून यादिवशी त्यांच्या नावानं उपवास ठेवला जातो.

हा उपवास धरणाऱ्या प्रत्येक भक्ताचे सर्व संकट गणपती आपल्याकडे घेतो. संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष चतुर्थीच्या तिथीनुसार साजरी केली जाते. पुर्ण वर्षात संकष्टी चतुर्थीचे 13 व्रत ठेवले जातात. यामुळं आज आम्ही तुम्हाला पुढील वर्षात म्हणजेच 2021 मध्ये येणाऱ्या संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi 2021) ची यादी देणार आहोत.

शनिवार, 02 जानेवारी संकष्टी चतुर्थी

रविवार, 31 जानेवारी संकष्टी चतुर्थी

मंगळवार, 02 मार्च अंगारकी चतुर्थी

बुधवार, 31 मार्च संकष्टी चतुर्थी

शुक्रवार, 30 एप्रिल संकष्टी चतुर्थी

शनिवार, 29 मे संकष्टी चतुर्थी

रविवार, 27 जून संकष्टी चतुर्थी

मंगळवार, 27 जुलै अंगारकी चतुर्थी

बुधवार, 25 ऑगस्ट संकष्टी चतुर्थी

शुक्रवार, 24 सप्टेंबर संकष्टी चतुर्थी

रविवार, 24 ऑक्टोबर संकष्टी चतुर्थी

मंगळवार, 23 नोव्हेंबर अंगारकी चतुर्थी

बुधवार, 22 डिसेंबर संकष्टी चतुर्थी

संकष्टी चतुर्थीची पूजा- विधी

- सकाळी आंघोळ करा आणि स्वच्छ धुतलेले कपडे घाला.

- सकाळी गणपतीची पूजा करा. त्यांना तीळ, गूळ, लाडू, दुर्वा, चंदन अर्पण करा आणि गणपतीला वंदन करा.

- या दिवशी गणपतीच्या मंत्रांचा जप करावा आणि पूर्ण दिवसभर उपवास ठेवावा.चंद्रोदयानंतर सोडावा.

-संध्याकाळी चंद्र उगवण्यापूर्वी गणपतीचे पूजन करा.

- व्रत कथा सांगा किंवा ऐका. चंद्राला अर्घ्य अर्पण करा.