crime newscrime news- देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना बलरामपूरमध्ये घडली आहे. इयत्ता नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर 8 जणांनी तब्बल 13 दिवस बलात्कार (rape case) केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ माजली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे चौकशीदरम्यान, आरोपींपैकी 6 जण अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे.

------------------------------------------------------------------

Must Read

1) 'या' जिल्ह्यातील पर्यटनस्थळे उद्यापासून खुली करणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

2) मराठा आरक्षणासाठी आजचा दिवस महत्वाचा, घटनापीठसमोर सुनावणी

3) शिक्षण सेवकांची थांबवलेली भरती पुन्हा सुरू होणार !

4) लालबाग सिलिंडर स्फोटप्रकरणी पिता-पुत्रावर मनुष्यवधाचा गुन्हा

5) चार कॅमेऱ्यांचा Vivo Y51 भारतात लॉन्च; अद्ययावत फिचर्ससह बजेट स्मार्टफोन

-------------------------------------------------------------------

छत्तीसगडमधील बलरामपूर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता नववीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी आपल्या घरी न सांगताच काही मैत्रिणींना भेटण्यासाठी गेली होती. तेथेच तिची एका मुलाशी ओळख झाली. ती त्या मुलासोबत गेली असता, त्या मुलाने तिच्यावर बलात्कार केला. तसेच त्या मुलाने तिला त्याच्या काही मित्रांकडे सोपवलं. त्या 8 जणांनी विद्यार्थिनीवर बलात्कार केला. (crime news)

विद्यार्थिनी 20 नोव्हेंबर रोजी घरी न सांगताच मैत्रिणींना भेटण्यासाठी गेली होती. त्यावेळी भेटलेल्या एका मुलासोबत ती गेली. 8 जणांनी तब्बल 13 दिवस मुलीवर बलात्कार (rape case) केला. सतत झालेल्या या प्रकारानंतर मुलीची तब्येत बिघडली असल्याची माहिती आहे. मुलगी बेपत्ता झाल्याने, तिचे कुटुंबीय अतिशय चिंतेत होते. नातेवाईकांकडे मुलीचा शोध घेण्यात आला. मात्र ती कुठेही सापडली नाही.

मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार केली. तक्रारीनंतर तपास सुरू झाला आणि 5 डिसेंबर रोजी पोलिसांना मुलीचा शोध लागला. आरोपींना अटक करण्यात आली आहे. विद्यार्थिनीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 13 दिवसांत 8 मुलांनी वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केला आहे. 8 जणांपैकी 6 आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.