Sharad Pawar


politics news- राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा 12 डिसेंबरला 80 वा वाढदिवस आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांच्या वाढदिवसाची जंगी तयारी सुरू आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी 80 हजार तरुणांना रोजगार (recruitment) देणार अशी घोषणाच राज्याचे कौशल्य विकास आणि रोजगार मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

__________________________

Must Read

1) सूत दरवाढीविरोधात प्रांताधिकाऱ्यांना गाऱ्हाणे

2)भारत बंद : राज्यात कामगार-बँक संघटना, व्यापारी यांचा पाठिंबा... पण

3) विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेमध्ये मोठा गैरप्रकार

4) विराट कोहलीने रचला इतिहास, वाचा काय आहे हा विक्रम

5) Airtelची उत्तम योजना! दररोज 3 जीबी डेटा, फ्री कॉलिंग आणि Disney+ Hotstar VIP कमी किमतीत उपलब्ध

_______________________________

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राज्याच्या कौशल्य विकास विभागामार्फत ऑनलाईन रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून 80 हजार युवकांना रोजगार (recruitment)  उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.

दिनांक 7 ते 12 डिसेंबर 2020 पर्यंत rojgar.mahaswayam.gov.in आणि yodhaat80.org या दोन संकेतस्थळावर नोकरी देणारे आणि नोकरी हवी असणारे लोकं नोंदणी करू शकतात. तसंच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते देखील जिल्हा स्तरावर नोंदणी करण्याचा उपक्रम राबविणार आहेत. त्यानंतर 12 आणि 13 डिसेंबर 2020 रोजी ऑनलाइन मुलाखतीच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी दिल्या जातील, असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

7 डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी 214 कंपन्यांनी उपक्रमामध्ये नोंदणी केली आहे. 80 हजार तरुणांना रोजगार दिला जाईलच. पण हा आकडा आणखी जास्त वाढण्याची शक्यता आहे. कारण, कंपन्यांची मागणी अधिक असल्यामुळे हा आकडा एक लाखाच्यावरही जाऊ शकतो, असंही मलिक यांनी सांगितले.

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाकडून रक्तदान शिबिरे'

दरम्यान, राज्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबिरं (blood donation) घेण्यासंदर्भात जयंत पाटील यांना पत्र लिहिलं असून या रक्तदान शिबिरातून मोठ्या प्रमाणात रक्ताचा पुरवठा होईल, असा विश्वास आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला. 'राज्यात 5 ते 6 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा सध्या शिल्लक असून रक्तदान वाढवणं गरजेचं असल्याचं देखील टोपे म्हणाले.