Redmi 9 Power



Technology- शाओमीचा (Xiaomi) नवा स्मार्टफोन रेडमी 9 पॉवर (Redmi 9 Power) आज 17 डिसेंबर रोजी भारतात लाँच होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून फोनचा टीजर जारी करण्यात येत होता. Redmi 9 Power दुपारी 12 वाजता ऑनलाईन लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारे लाँच केला जाणार आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यानुसार फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा, ज्यात 48 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट टेक्नोलॉजी असल्याचं समोर आलं होतं.

शाओमी इंडियाच्या इव्हेंट पेज आणि अमेझॉनवर लाईव्ह झालेल्या पेजद्वारे हा एक पॉवर-पॅक्ड #PowerPacked स्मार्टफोन असेल. फोनचे फीचर्स रेडमी नोट 9, 4G प्रमाणे असू शकतात. यात 6.53 इंची फुल एचडी IPS एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनचा डिस्प्ले वॉटर ड्रॉप नॉच डिस्प्लेसह असू शकतो. Redmi 9 Power 15 हजारांच्या रेंजमध्ये लाँच केला जाण्याची शक्यता आहे.



फोनला 4GB रॅम आणि 128 GB पर्यंत इंटरनल स्टोरेज असू शकतो. स्नॅपड्रॅगन 662 SoC चिपसेट प्रोसेसर दिला जाऊ शकतो. रेडमी 9 पॉवरमध्ये चार रियर कॅमेरे दिले जातील. यात 48 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा असेल. ‘Redmi’s Biggest Battery Yet’ असं अमेझॉनच्या लाईव्ह पेजवर लिहिण्यात आलं आहे. फोनला 6000mAh दमदार बॅटरी असेल.

Redmi 9 Powerफोन ग्रे, ब्लू, रेड आणि ग्रीन कलरमध्ये लाँच केला जाईल. Redmi 9 Power हा कंपनीच्या 9व्या सीरीजचा चौथा फोन आहे. या सीरीजमध्ये आधी रेडमी 9A, Redmi 9 आणि Redmi 9i सामिल आहेत.