
(Kolhapur Coronavirus) जिल्ह्यात गेल्या 24 तासात 15 नवेकोरोनाबाधित सापडले आहेत तर 21 व्यक्ती कोरोना (Kolhapur Coronavirus) मुक्त झाल्या आहेत. जिल्हाभरातील सर्व कोवीड सेंटरवर एकूण 63 कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. तर दोन व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. उर्वरीत सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
गेल्या पाच दिवसात एकूण 26 कोरोना बाधित व्यक्तीची प्रकृती गंभीर होती. त्यापैकी 16 व्यक्तीवर सीपीआर रूग्णालयात तर उर्वरीत सर्व व्यक्तीवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन व्यक्तींचा मृत्यू झाला यात एका हातकणंगले तालुक्यातील 65 वर्षाच्या पुरूष तर एक करवीर तालुक्यातील 19 वर्षीय युवतीचा समावेश आहे. यात दिर्घ आजारा सोबत फुप्फुसातील संसर्ग, श्वसन विकार अशी लक्षणे होती. अ(Kolhapur Coronavirus) शी माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली आहे.
दरम्यान जिल्ह्यातील 14 कोवीड सेंटरवर गेल्या 24 तासात 142 हून अधिक व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत.
एकूण कोरोना बाधित ः 49 हजार 506
कोरोना मुक्त ः 47 हजार 740
कोरोना मृत्यू ः 1 हजार 703
उपचार घेणारे ः 63