जर तुमच्याकडे ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सचं (Netflix) सब्सक्रिप्शन नसेल, तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कंपनी युजर्सला फ्रीमध्ये नेटफ्लिक्सचं सब्सक्रिप्शन देत आहे. नेटफ्लिक्सने आपल्या युजर्ससाठी एक खास ऑफर आणली आहे. ज्याद्वारे युजर्स या वीकेंडला फ्री स्ट्रिमिंगचा फायदा घेऊ शकणार आहेत.

___________________________

Must Read

1) अभिनेता स्वप्नील जोशीचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक

2) HDFC बँकेला मोठा झटका!

3) हरभजनने केली कोरोना लसीची मस्करी, IPS अधिकाऱ्याने सुनावलं

4) PUBG Mobile India भारतात लॉन्च होणार का नाही? कंपनीने दिलं उत्तर

5) विराटच्या सहाय्यकाचे अखेर विलगीकरण संपले

6) लॉकडाऊनमध्ये सेक्स टॉईजचा बाजार वाढला...हे शहर आघाडीवर...

_____________________________

अमेरिकन कंटेन्ट स्ट्रिमिंग कंपनी 5 आणि 6 डिसेंबर रोजी एका स्ट्रिमफेस्टचं (Netflix Stream Fest) आयोजन करणार आहे. त्यामुळे ज्या युजर्सकडे नेटफ्लिक्सचं सब्सक्रिप्शन नाही, अशा लोकांना या स्ट्रिमफेस्टद्वारे नेटफ्लिक्स कंटेन्ट फ्रीमध्ये ऍक्सेस करण्याची संधी मिळणार आहे. कंपनी ही ऑफर स्ट्रिमफेस्ट (StreamFest) अंतर्गत देणार आहे. आज रात्री 12 वाजल्यापासून नेटफ्लिक्स फ्रीमध्ये वापरता येणार आहे. हा फ्री ऍक्सेस 6 डिसेंबरपर्यंत असणार आहे. यावेळी कोणतेही क्रेडिट कार्ड (Credit Card) किंवा पेमेंट डिटेल्स द्यावे लागणार नाही.

अधिकाधिक लोकांना आपल्या प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी कंपनीने या ऑफरची घोषणा केली आहे. नेटफ्लिक्स या स्ट्रिमफेस्टद्वारे भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेत नव्या ग्राहकांना जोडू इच्छित आहे. भारतात नेटफ्लिक्सचे अ‍ॅमेझॉन प्राईम (Amazon Prime) व्हिडिओ, डिज्नी हॉटस्टार, Zee5, MX Player असे अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म प्रतिस्पर्धी आहेत. अशात आपला युजर बेस वाढवण्यासाठी कंपनी स्ट्रिमफेस्टचं आयोजन करत आहे.

नेटफ्लिक्स इंडियाच्या उपाध्यक्ष मोनिका शेरगिल यांनी सांगितलं की, 5 डिसेंबर रात्री 12 वाजल्यापासून 6 डिसेंबर रात्री 12 पर्यंत भारतातील ग्राहकांसाठी नेटफ्लिक्स मोफत उपलब्ध असणार आहे. युजरकडे नेटफ्लिक्सचं सब्सक्रिप्शन नसल्यास युजर नाव, ईमेल आयडी, फोन नंबर आणि पासवर्डसह नेटफ्लिक्सच्या वेबसाईट किंवा अ‍ॅपवरून साइनअप करू शकतात. कंटेन्ट स्ट्रिमिंगसाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाही.

या स्ट्रिमिंग फेस्टमध्ये एकदा रजिस्टर्ड केल्यानंतर स्मार्ट टीव्ही, गेमिंग कंसोल, अ‍ॅपल, अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप किंवा वेबवर नेटफ्लिक्सवरच्या सर्व गोष्टी पाहता येणार आहेत. स्ट्रिमफेस्ट सुविधेद्वारे स्टँडर्ड डेफिनेशन सिंगल स्ट्रिमिंगची सुविधा मिळणार आहे. देशातील लोकांना आपल्या कंटेन्टकडे आकर्षित करणं हा या मागचा उद्देश आहे.