
(Bollywood News) दोन महिन्यांपूर्वीच बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) ही तिचा बॉयफ्रेंड रोहनप्रीतसोबत लग्नबंधनात अडकली. नेहा व रोहनप्रीतने शीख पद्धतीनुसार गुरुद्वाऱ्यात लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता नेहाने तिच्या चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे.
नेहाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो पोस्ट केला आहे. त्यात ती तिचा पती रोहनप्रीतसोबत दिसत आहे. या फोटोवर तिने ख्याल रखा कर असा हॅशटॅगही दिला आहे. या पोस्टमधील फोटोवरून ती गर्भवती असल्याचं दिसून येत आहे.
Must Read
1) अजित पवारांनंतर भाजप आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला
2) शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सरकारनं सुरू केली ही नवी योजना
3) सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय
4) Facebook वरून मैत्री करून फसवणाऱ्या नागरिकाला अटक
5) ईशा गुप्ताच्या बाथरूम सेल्फीने सोशल मीडियावर धुमाकूळ
फोटोच्या खाली रोहनप्रीत याने आता तर अजून काळजी घ्यावी लागेल अशी कमेंट (Bollywood News) केली आहे. त्यामुळे चाहत्यांनी त्यांच्या या गोड बातमीवर त्यांचं अभिनंदन करायला सुरुवात केली आहे.
नेहाचा 20 ऑक्टोबर रोजी रोहनप्रीत सोबत साखरपुडा झाला होता. त्यानंतर लगेचच 24 ऑक्टोबर रोजी नेहा आणि रोहनप्रीत सिंग यांनी आनंद कारज पद्धतीने गुरुद्वाऱ्यात लग्नगाठ बांधली होती.