ncp-chief-sharad-pawar

 Political News : विनोदी विधाने करणं हा चंद्रकांत पाटलांचा (Chandrakant Patil) लौकिक असल्याचा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी गेलाय. धुळे नंदुरबार मधील निकालाचे आश्चर्य नाही मात्र इतर ठिकाणी आम्हाला मिळालेलं यश महत्वाचं असल्याचे पवार म्हणाले. महाविकास आघाडीच एकत्रित येऊन वर्षभर केलेलं काम लोकांनी स्वीकारलं. महाराष्ट्राचं चित्र बदलत आहे. त्याला सर्वसामान्य लोकांचा पाठिंबा दिल्याचे पवार म्हणाले.

-------------------------------------

Must Read

1) अभिनेता स्वप्नील जोशीचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक

2) HDFC बँकेला मोठा झटका!

3) हरभजनने केली कोरोना लसीची मस्करी, IPS अधिकाऱ्याने सुनावलं

4) PUBG Mobile India भारतात लॉन्च होणार का नाही? कंपनीने दिलं उत्तर

5) विराटच्या सहाय्यकाचे अखेर विलगीकरण संपले

6) लॉकडाऊनमध्ये सेक्स टॉईजचा बाजार वाढला...हे शहर आघाडीवर... 

---------------------------------------

मागच्या वेळी विधान परिषदेला कसे निवडून आले हे त्यांना माहिती आहे. म्हणून त्यांनी विधानसभेला पुण्यातील सुरक्षित मतदार संघ निवडला. चंद्रकांत पाटलांना विश्वास असता तर त्यांनी मतदारसंघ बदलला नसता. त्यामुळे ते जे बोलतात त्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही असे पवार म्हणाले.

अजित पवारांची प्रतिक्रिया 


एक वेगळा प्रयोग शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरेंनी केला. त्याचं हे यश असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. अमरावतीची जागा आली असती तर आणखी आनंद झाला असता. तिथं जे घडलं त्याचं दुःख असल्याचे पवार म्हणाले. वाचाळ बडबड करणार्यांना ही जबरदस्त चपराक आहे. लोकांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिकाल हे निकालावरून स्पष्ट झालय. सुशिक्षित तसेच शिक्षक मतदारांनी आम्हाला निवडून दिल्याचे ते म्हणाले. 

तीन पक्ष एकत्र येण्याचा फायदा होतो हे सिद्ध झालं. आम्ही एकटे यायचं की आघाडी करून यायचं हे आमचे वरिष्ठ ठरवतील. आम्हाला कोणी सल्ला द्यायचं कारण नसल्याचे टोला त्यांनी लगावला. आगामी काळात जास्तीत जास्त एकत्र येऊन आघाडी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमच्या वेगळं लढण्यानं विरोधकांच फावणार असेल तर तसं व्हायला नको असेही अजित पवार म्हणाले.