politics news of indiapolitics news of india- महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष राज्यात आगामी काळात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत आणि महापालिका निवडणुका (municipal elections)स्वतंत्रपणे लढून नंतर एकत्र येऊ शकतात असे संकेत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे (politics party of india) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाशिक येथील पत्रकार परिषदेत बोलतांना दिले आहेत. त्यामुळे भुजबळ यांच्या विधानामुळे महाविकास आघाडी आगामी निवडणुका आघाडीने लढणार की स्वतंत्रपणे लढणार, हा नवा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

राज्यात नुकत्याच झालेल्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपमध्ये थेट लढत पाहायला मिळाली. अर्थात तीन पक्षांच्या एकजुटीपुढे भाजपचा टिकाव लागला नाही. सहा पैकी 4 जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला. भाजपच्या पदरी फक्त एक जागा पडली. 

------------------------------------------------

Must Read

1) ग्रामपंचायत बिनविरोध करा अन् पंचवीस लाख रूपये मिळवा! आमदारांची ऑफर

2) मोठी घडामोड, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट पत्र

3) रस्त्यात गाडी थांबवून शरद पवारांनी दिले आशीर्वाद

4) ब्लॅकमेल करत तब्बल 21 वर्षे केलं लैंगिक शोषण आणि त्यानंतर...

5) MIM च्या नेत्याने तिघांना घातल्या गोळ्या VIDEO


--------------------------------------------------------

आता ग्रामपंचायत निवडणूक आणि नंतर पालिका निवडणुकात (municipal elections)पुन्हा एकदा राजकीय वर्चस्वाची लढाई पाहायला मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी आज महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी (politics party of india) हे तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढून नंतर एकत्र येऊ शकतात असे संकेत दिले. भुजबळ यांचे हे विधान पाहता महाविकास आघाडी भाजपला रोखण्यासाठी त्या त्या वेळची स्थिती लक्षात घेऊन व्यूहरचना आखणार, असे संकेत मिळू लागले आहेत.

ग्रामीण भागातील शाळा 4 जानेवारीपासून

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा 4 जानेवारीपासून सुरू केल्या जातील, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. नाशिक शहरातील शाळा सुरू करण्याबाबतही आग्रह होत आहे. परंतु, ठाणे, मुंबई, पुणे शहरात काय निर्णय घेतला जातो याकडे लक्ष ठेऊन निर्णय घेतला जाईल, असे भुजबळ यांनी केले स्पष्ट केले आहे.

जानेवारी अखेरपर्यंत लसीकरण

कोविड प्रतिबंधक लस देण्याची प्राथमिक तयारी पूर्ण झाली आहे. जानेवारी अखेरपर्यंत जिल्ह्यात लस येणार आहे. 600 बुथवरून ही लस दिली जाईल. एका बुथवर दररोज 100 जणांना लस दिली जाईल. त्यामुळे दररोज 60 हजार लोकांना लस मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात प्राधान्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.