viral videosports- हेलिकॉप्टर शॉट म्हटलं की पहिलं नाव येतं ते धोनीचं. IPL असो किंवा भारतीय संघाकडून खेळायचं असो, धोनीने हेलिकॉप्टर शॉटच्या मदतीने अनेकदा उत्तुंग असे षटकार लगावले (viral video) आहेत. धोनीच्या या शॉची अनेकांनी नकलही केली आहे. 

---------------------------------------
Must Read

1) नृसिंहवाडीतील दत्त जयंती सोहळा रद्द

2) ...आणि 'पवारांचे पाय चाटायला कोण गेलं होतं?'

3) Two wheeler : नवीन वर्षात दुचाकी महागणार

4) 2021 च्या वर्षात सर्वाधिक वेळा 'वीकएंड'लाच येणार संकष्टी चतुर्थी

-----------------------------------------

मॅक्सवेल आणि हार्दिक पांड्यासारखे खेळाडू आज सहजासहजी हेलिकॉप्टर शॉट मारत आहेत. याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. असाच एका हेलिकॉप्टर शॉटचा व्हिडीओ सध्या मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये धोनी जसा हेलिकॉप्टर शॉट खेळतो, तसाच हेलिकॉप्टर शॉट फलंदाज एका हाताने मारताना दिसतं आहे.माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट (viral video) केला आहे. या व्हिडीओमध्ये फलंदाज एका हातानं ‘हेलिकॉप्टर शॉट’ (#helicoptershot ) मारत असल्याचं दिसत आहे. बॅकग्राउंडला समालोचक आकाश चोप्रा यांचा आवाजही आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ पाहून अनेंकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका हातानं षटकार मारलेला फलंदाज नेमका कोण आहे? याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र सोशल मीडियावर हा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला आकाश चौप्रा यांचं समालोचन करताना दिसत आहे.