crime news -suicide casesuicide case - जांभळी (ता. शिरोळ) येथील आईने दोन मुलींसह आत्महत्या केल्याप्रकरणी मृत सुप्रियाची आई सुवर्णा शिवाजी डांगे (जांभळी) यांनी मुलीची सासू व पतीच्या शारीरिक, मानसिक छळाला (harassments) कंटाळून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पती शिवाजी रघुनाथ भोसले व सासू विमल रघुनाथ भोसले (यादव मळा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

जांभळी येथे आईने दोन मुलींसह मंगळवारी आत्महत्या (suicide case)केली. पोलिसांनी पती शिवाजी याचा जबाब नोंदवला. पोलिसांनी पीडित भोसले कुटूंब, मृत सुप्रियाचे मामा, आई-वडील तसेच इतर ठिकाणी गोपनीय चौकशी सुरू ठेवली. अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या भेटीनंतर सुप्रियाच्या आईने गुरुवारी शिरोळ पोलिसांत फिर्याद दिली आहे.

----------------------------------------------------

Must Read

1) अजित पवारांनंतर भाजप आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला

2) शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सरकारनं सुरू केली ही नवी योजना

3) सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

4) Facebook वरून मैत्री करून फसवणाऱ्या नागरिकाला अटक

5) ईशा गुप्‍ताच्या बाथरूम सेल्फीने सोशल मीडियावर धुमाकूळ

-----------------------------------------------------------------

पती शिवाजी याचा सुप्रियाशी पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्याने पहिल्या पत्नीला सोडचिठ्ठी दिली आहे. प्रेमविवाहानंतर सुप्रियाला दोन वर्षे त्रास दिला नाही. त्यानंतर तुझ्या आई-वडिलांनी लग्नानंतर काहीच दिले नाही म्हणून शारीरिक, मानसिक त्रास (harassments)  देऊन हुंडा आणण्याची मागणी सुरू केली. या त्रासाला कंटाळून तिने मुलींसह आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. तपास शिरोळ पोलिस करीत आहेत.