crime news- एका महिलेने आपल्या जावयावरच विनयभंगाचा (harassments) आरोप केला आहे. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरु केला आहे. सोमवारी रात्री महिला तिच्या घरामध्ये पूजा करत असताना, रात्री आठच्या सुमारास जावई तिथे आला. तिने त्याला दुसऱ्या रुममध्ये आराम करायला सांगितला. तक्रार नोंदवणारी महिला भोपाळच्या गोविंदपुरा भागामध्ये राहते.

त्याच दिवशी रात्री १२.३० च्या सुमारास महिला पाणी आणण्यासाठी म्हणून विहिरीवर गेली होती. ती घरी आल्यानंतर जावयाने तिला त्याच्या रुममध्ये बोलावले व जबरदस्ती (harassments) करण्याचा प्रयत्न केला, असे पोलिसांनी सांगितले. (crime news)

महिलेने रात्री उशिरा गोविंदपुरा पोलीस ठाणे गाठले व जावयाविरोधात तक्रार नोंदवली. तिच्या तक्रारीवरुन जावयाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीला अटक करण्यासाठी या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

----------------------------------------------------

Must Read

1) मोठी बातमी : एल्गार परिषदेला पोलिसांनी परवानगी नाकारली

2) मराठा समाजाला राज्य सरकारचा दिलासा

3) SC, ST विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज!

4) हेअरकटनंतर व्हायरल झाला फोटो, तब्बल 10 वर्षांनंतर झाली कुटुंबीयांची भेट

5) सुरेश रैनाने मागितली माफी, 'त्या' रात्रीची पूर्ण कहाणी समोर

6) मलम लावण्याच्या बहाण्याने तरुणीच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श

--------------------------------------------------------