molestation casecrime news- महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या (molestation) घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच एका नऊ वर्षांच्या मतिमंद चिमुरडीवर शेजारी राहणाऱ्या नराधमाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना धामणकर नाका परिसरात घडली आहे. याप्रकरणी पीडित चिमुरडीच्या आईने नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी नराधम आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

__________________________

Must Read

1) सूत दरवाढीविरोधात प्रांताधिकाऱ्यांना गाऱ्हाणे

2)भारत बंद : राज्यात कामगार-बँक संघटना, व्यापारी यांचा पाठिंबा... पण

3) विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेमध्ये मोठा गैरप्रकार

4) विराट कोहलीने रचला इतिहास, वाचा काय आहे हा विक्रम

5) Airtelची उत्तम योजना! दररोज 3 जीबी डेटा, फ्री कॉलिंग आणि Disney+ Hotstar VIP कमी किमतीत उपलब्ध

_______________________________


इम्रान इब्राहिम शेख (वय ३८) असे आरोपीचे नाव आहे. तो पीडित मुलगी राहत असलेल्या ठिकाणी वरच्या मजल्यावर राहत होता. पीडित चिमुरडी ही एक वर्षांची असताना तिला आकडी आल्याने तिची बौद्धिक क्षमता कमी असल्याची माहिती पीडितेच्या आईने पोलिसांना दिली. याच बाबीचा नराधम आरोपीने गैरफायदा घेत पीडित चिमुरडीस घरात कोणी नसताना आरोपीने पहिल्या माळ्यावर बोलावले. (crime news)

चिमुरडीच्या बालवयाचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. वेदना असह्य झाल्याने पीडित चिमुरडी घराशेजारीच रडत बसली असताना शेजारील महिलेले तिची विचारपूस करून फोनद्वारे इम्रान शेख याने मुलीवर अत्याचार केल्याची खबर चिमुरडीच्या आईस दिली. आईने घरी धाव घेत मुलीकडे विचारणा केल्यानंतर प्रकार समजल्यावर मुलीच्या आईवडिलांच्या पायाखालची वाळू सरकली. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात इम्रान शेख याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा (rape case) दाखल करण्यात आला आहे.

अधिक तपास सुरु

न्यायालयाने आरोपीला ११ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड करीत आहेत.पीडित चिमुरडी ही एक वर्षांची असताना तिला आकडी आल्याने तिची बौद्धिक क्षमता कमी असल्याची माहिती पीडितेच्या (rape case) आईने पोलिसांना दिली