mla-raju-awale-offered-development-fund-villages

(Kolhapur Politics) हातकणंगले (Hatkanangaleविधानसभा मतदारसंघातील ज्या गावच्या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होतील त्या गावासाठी तत्काळ २५ लाखांचा आमदार निधी विकासकामांसाठी देण्यात येईल अशी घोषणा आमदार राजू आवळे यांनी केली.हातकणंगले विधानसभा मतदारसंघात १९ गावातील  ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यानिमित्ताने गावपातळीवर राजकीय ईर्षा, हेवेदावे यातून तणाव  निर्माण होतो. दुफळी होऊन मतभिन्नता वाढल्याचे चित्र दिसून येते. 

यातून सार्वजनिक ऐक्य नाहीसे होते. याउलट जर निवडणुका बिनविरोध केल्या तर गावची एकी अधिक मजबूत होते. सामाजिक सलोखा निर्माण होतो. सहकार्यातून विकासाचे भव्य काम करण्यास मदत होते. त्यामुळे निवडणुका बिनविरोध करण्यास प्राध्यान्य दिले पाहिजे. (Kolhapur Politics) यासाठी १७ सदस्य असणाऱ्या गावासाठी २५ लाखाचा तर १५ सदस्य असणाऱ्या ठिकाणी २० लाख तर १३ सदस्य व त्यापेक्षा कमी सदस्य संख्या असणाऱ्या गावासाठी १५ लाखाचा निधी देण्यात येईल. साहजिकच बिनविरोध निवडणुकांमुळे पैशाची बचत होणार आहे. प्रशासकीय यंत्रणेचा ताण कमी होईल. यासाठी बिनविरोध निवडणुकीस प्राधान्य द्या असे आवाहन आवळे यांनी केले आहे.