mim-leader-shot-three-capturing-the-shocking


(Crime) तेलंगणातील आदिलबादमधील टाटीगुडा भागात एआयएमआयएमच्या (AIMIM) जिल्हा अध्यक्ष मोहम्मद फारुख (Mohd Farooq) यांनी शुक्रवारी गोळीबार केल्याची घटना समोर केली आहे. या घटनेत तीन लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. रामागुंडम जिल्ह्याचे पोलीस आयुक्त सत्यनारायण यांनी याची माहिती दिली आहे.

या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये गोळीबाराचे दृश्य दिसून येत आहे. (Crime) गोळीबारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सुरुवातील एमआयएमचा नेता व काही नागरिकांमध्ये झटापट झाली. यानंतर नेत्याने पिस्तूल काढून बेछूट गोळीबार करण्यास सुरुवात केली. गोळ्यांचा आवाज ऐकून गोंधळ वाढला. यामध्ये तिघेजण जखमी झाले आहेत. यावेळी अनेकजण नेत्याला थांबविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.