mika-singh-slams-kangana-ranaut

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) सध्या तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. शेतकरी आंदोलनावरुन कंगना आणि अभिनेता दिलजीत दोसांज यांच्यामध्ये ट्विटर वॉर सुरु होते. दरम्यान मिक्का सिंग (Mikka Sing) ने ट्विट करत कंगनावर निशाणा साधला आहे.

_______________________

Must Read

1) मराठा आरक्षण : वकिलांची समन्वय समिती जाहीर

2) चर्चेची पाचवी फेरीही निष्फळ ठरल्याने शेतकरी संतापले

3) प्रमुख धर्मस्थळे, महत्त्वाच्या ठिकाणी बंदाेबस्तात वाढ, ६ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खबरदारी

4) वनडेचा ‘डॉन’ बनण्याकडे विराटची वाटचाल

5) रिंकू राजगुरूच्या चाहत्यांसाठी खुशखबर! दिसणार या हिंदी चित्रपटात

6) संजय राऊत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

______________________________

मिक्काने नुकताच एक ट्विट केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्याने कंगनाला सुनावले आहे. “आपल्या सर्वांचा हेतू शेतकऱ्यांना समर्थन करण्याचा आहे. त्यामुळे सर्वांनी तेथे लक्ष केंद्रीत करा. ती वेडी आहे, त्यामुळे तिला तिचे आयुष्य जगू द्या. बेटा कंगना तू करण जोहर, रणवीर सिंह, हृतिक रोशन आणि बॉलिवूडमधील इतर कलाकरांना ‘सॉफ्ट टारगेट’ करतेस. पण माझ्या बाबतीत असे होणार नाही” या आशयाचे ट्विट त्याने केले होते.

दरम्यान, मिक्का सिंगने केले आजवर २० लोकांना तरी मदत केली आहेस का? असा सवाल त्याने कंगनाला केला होता. “आम्ही दिवसाला पाच लाखांपेक्षा अधिक लोकांना जेवण देतो. तू किमान २० लोकांना तरी मदत कर. सोशल मीडियावर स्वत:ला वाघिण म्हणतेस. वाघिण होणे सोपे आहे पण दररोज लोकांना मदत करण सोप नाही” अशा आशयाचे ट्विट करुन मिक्काने कंगनावर निशाणा साधला होता.

शेतकरी आंदोलनात ८७ वर्षांच्या महिंदर कौर सहभागी झाल्या होत्या. त्यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती. कंगनाने त्यांची तुलना शाहीन बाग प्रकरणातील बिलकिस दादी यांच्यासोबत केली होती. तिला या ट्विटमुळे ट्रेल केले जात होते. सोशल मीडियावर सुरु झालेल्या ट्रोलिंगनंतर कंगनाने तिचं हे ट्विट डिलीट केलं आहे.