maratha-reservation-advocates-coordinating-committee-announced

एसईबीसी आरक्षण  (SEBC Reservation) प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा  अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या मागणीसंदर्भात ५ सदस्यीय घटनापीठासमोर होणाऱ्या सुनावणीच्या अनुषंगाने मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पाच वकिलांची समन्वय समिती जाहीर केली आहे. 

Must Read
समितीमध्ये ॲड. आशिष गायकवाड, ॲड. राजेश टेकाळे, ॲड. रमेश दुबे पाटील, ॲड. अनिल गोळेगावकर व ॲड. अभिजीत पाटील यांचा समावेश आहे. याबाबत ९ डिसेंबरला दुपारी २ वाजता होणाऱ्या सुनावणीच्या अनुषंगाने समाजातील नागरिक, समन्वयक, अभ्यासक व संघटनांना कायदेशीर स्वरूपाच्या सूचना मांडायच्या असतील तर समन्वय समितीतील सदस्यांशी संपर्क साधावा.